डॉ. रामदास आबणे दादासाहेब फाळके परिवार केएएफ (KAF) पुरस्काराने सन्मानित

 


पुणे दि. ३ (प्रतिनिधी) येथील डॉ. रामदास आबणे यांना भारतीय सिनेसृष्टीचे जनक भारतरत्न स्व. दादासाहेब फाळके यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील केएएफ संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला होता.


३० एप्रिल २०२५ रोजी मुंबईत हा पुरस्कार दिला गेला. साहित्य व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. रामदास आबणे यांची पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती केएएफ संस्थेचे डॉ. सुधीर तरे यांनी दिली. प्राचार्य आबणे यांनी विद्यार्थीदशेत असताना गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. त्यांनी विविध विषयात संशोधन करून चार वेळा पीएच.डी. पदवी मिळवली आहे. संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे आणि संत सावता महाराज यांच्यावर त्यांनी विशेष लेखन केले आहे. टपाल खात्याने डॉ. रामदास आबणे यांच्यावर तिकीटही प्रकाशित केले आहे. 

मा. सर्वेश्री, डॉ,सुधिर तारे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वर्गीय डॉ,रवीन्द्र आरोरा यांच्या स्मृत्यर्थ डॉ, प्रफूल आगवने, कफ़ अवार्ड सचिव तसेच शशि दीप मेदम , काफ़ अवार्ड उप सचिव, ॲड. खालिद सर, राम भट्टर या पदाधिकारी यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. सदर कार्यक्रमास डॉ.रामदास आबणे,  तसेच दादासाहेबांचे नातु सुन व नात तसेच बॉलिवुड चे अभिनेता व अभिनेत्री कलाकार व वरिष्ठ अधिकारी, फिल्म सिटीचे P.R.O. मंगेश राऊत साहेब, सरिता चौधरी, ज्योती नीसल, माया गुप्ता, नितु कोइराला, राजेश पारकेर, रानी खेडेकर, रजिया मॅडम उपस्थित होते, या सर्वांनी कार्यक्रम पाडण्यास  सहकार्य केले.

डॉ. रामदास आबणे यांनी हा पुरस्कार त्यांचे आध्यात्मिक गुरू हज़रत सुफी रफिक अहमद बाबा यांना समर्पित केला आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा