मधुरा चौधरी जगताप राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित



पुणे दि.१० (प्रतिनिधी) महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार खराडी येथील सारथी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मधुरा चौधरी जगताप यांना देऊन सन्मानित करण्यात आले.



  नुकतेच  पालघर येथे टीडीएफ च्या एक दिवसीय शिक्षक अधिवेशनामध्ये राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराचे वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योग मंत्री उदय सामंत,पालघर चे खासदार डॉ. हेमंत सावरा, राजेंद्र गावित, यांच्या हस्ते तसेच राज्याचे अध्यक्ष जी. के.थोरात,कार्यवाह के. एस.ढोमसे, नरसु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.



  टीडीएफ च्या वतीने मधुरा जगताप यांना सन्मानचिन्ह, शाल व मानपत्र देऊन राज्याचे अध्यक्ष जी.के.थोरात यांनी सन्मानित केले. मानपत्राचे  वाचन प्रा. संतोष थोरात यांनी केले.

 मधुरा जगताप मॅडम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदान प्रशालात राबवत असलेले वेगवेगळे उपक्रम, विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांमधील यश, उत्तम प्रशासकीय कौशल्य लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे जी.के. थोरात यांनी स्पष्ट केले.



   मधुरा जगताप यांनी सत्काराला उत्तर देताना हा सन्मान सारथी परिवाराचे सामूहिक यश असून सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे असे मत व्यक्त केले. हा पुरस्कार त्यांनी सारथी शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. सुरेशराव जगताप यांच्या पावन स्मृतीस समर्पित करून सारथी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त शैक्षणिक विकास साधण्यावर भर देणार असल्याचे मत व्यक्त केले तसेच या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल टीडीएफ संघटनेचे आभार मानले.

यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नानाराव कांबळे बाळासाहेब पवार, संतराम इंदुरे, अशोक देवकाते तसेच सारथी शिक्षण संस्थेतील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र जंगम यांनी केले तर आभार शुभांगी माने यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा