नवीन समर्थ कॉलेजचा बारावी सायन्स विभागाचा यंदाही शंभर टक्के निकाल

तळेगाव दाभाडे दि. 5 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2024-2025 रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदाही नवीन समर्थ विद्यालय आणि जुनिअर कॉलेजच्या बारावी सायन्स विभागाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या काॅलेजचा सलग दोन वर्षांपासून शंभर टक्के निकाल  लागला आहे. या काॅलेजचे  एकूण  71 विद्यार्थी  परीक्षेस बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले.



प्रथम तीन  आलेल्या  विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे – 
1) कु. कारके यश प्रकाश 89.50%
2) कु. आहेर तनिष्का विक्रम 80.83%
3) कु. धनशेट्टी स्वामिनी सचिन 80.67%


कॉलेजच्या प्राचार्या वासंती काळोखे,पर्यवेक्षक शरद जांभळे, तसेच मार्गदर्शक शिक्षक, शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे,उपक्रमशील सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा