इंद्रायणी जिमच्या सई अमोल शिंदेला आशियाई पाॕवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक

 


तळेगाव दाभाडे दि.10 (प्रतिनिधी) नुकत्याच देहराडुन ऊत्तराखंड येथे आशियाई  पाॕवरलिफ्टिंग स्पर्धा हॉटेल हयात या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेचे ऊद्घाटन ऊत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या हस्ते झाले व त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत  वेगवेगळ्या देशातुन २६० खेळाडुंनी सहभाग नोंदवला. 



इंद्रायणी जिमची व इंद्रायणी महाविद्यालय संचलित कांतिलाल शहा शाळेत इयत्ता १०वी मध्ये शिकणारी १५ वर्षीय खेळाडु कु. सई अमोल शिंदे ५७ किलो सबजुनियर गटात ३२० कीलो वजन उचलून रौप्य पदक मिळवून पुन्हा ऐकदा मावळ तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे या तिच्या यशाबद्दल मावळ तालुक्यात सर्वत्र तिचे कौतुक चालु आहे.



या यशामागे इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष  रामदासजी काकडे, चंद्रकांत शेटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. संभाजी मलगे 
कांतिलाल शहा इंग्लिश मिडीयम स्कुलचे चेअरमन  शैलेश भाई शहा मुख्यध्यापिका अनन्या कुलकर्णी  यांचे मोलाचे सहकार्य लाभले व इंद्रायणी जिमचे प्रशिक्षक छत्रपति पुरस्कार विजेते नितिन वसंतराव म्हाळस्कर व तिचे वडील अमोल शिंदे यांचे सुध्दा मोलाचे सहकार्य लाभले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा