इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत बारावीच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी

 


तळेगाव दाभाडे दि. 5 (प्रतिनिधी) : 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2024-2025 रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली.
           इंद्रायणी महाविद्यालयच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल यंदाच्याही वर्षी लागला असून, कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण शाखांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
          

विज्ञान शाखेतून मिताली संजय फडतरे या विद्यार्थिनीने 94.83% इतके गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकवला. वाणिज्य शाखेतून श्रुतिका जाधव या विद्यार्थिनीने 90.5% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
कला शाखेतून कुंदन बोरे या विद्यार्थ्याने 86.17 % गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर तंत्रशिक्षण विभागातून विनायक होटकर या विद्यार्थ्याने 76.33% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
        विज्ञान शाखेचा निकाल 97.78 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 95.18 टक्के, कला शाखेचा निकाल 76.66 टक्के, तर तंत्रशिक्षण शाखेचा निकाल 94.43 टक्के निकाल लागला आहे.



         सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले व सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
इंद्रायणी विद्यालयाचा शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे 
विज्ञान शाखा
1)मिताली संजय फडतरे -94.83%
2)उन्नती राजेश ठाकूर-92.83%
3)आकांक्षा पोपट दाभाडे-89.50%
वाणिज्य शाखा 
1) जाधव श्रुतिका विकास-90.5%
2)गोपाळे श्रुती प्रकाश-88%
2)काशीद कृष्णराज धनंजय-88%
3)गरुड मयुरा अमोल -84.17%
कला शाखा
1)बोरे कुंदन संदीप-86.17%
2)चिलप मयुरी निलेश-77.67%
3)वाघमारे कोमल राजेभाऊ-75.33%
तंत्रशिक्षण
1)होटकर विनायक मल्लिकनाथ-76.33%
2)माळी अथर्व अप्पासाहेब-67.83%
3)अंकुशी प्रदीप प्रकाश-66.83%

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


 

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा