तळेगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा स्टेशन भागात घुमला जयभिमचा जयघोष

 


तळेगाव दाभाडे दि. ३ (प्रतिनिधी) तळेगाव स्टेशन भागात इंद्रायणी विद्यामंदिर कॉलनी मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव प्रज्ञा महिला मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि.०१) उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी धम्म वंदना सामुहिक वंदन झाले.दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.



यावेळी माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेश काकडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे, प्रज्ञा महिला मंडळाच्या संस्थापक लताताई घोलप प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष, पत्रकार जगन्नाथ काळे, सतर्क महाराष्ट्र न्यूज चॕनलच्या संपादक, रेखा भेगडे यावेळी उपस्थित होते. यावेळी गणेश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय बौध्द महासभा उपाध्यक्ष अशोक काळे यांचे व्याख्यान झाले. 

कार्यक्रमाचे नियोजन प्रज्ञा महिला मंडळाचे अध्यक्ष सीमा ससाणे, उपाध्यक्ष शिल्पा गायकवाड, कार्याध्यक्ष साक्षी काकडे, सचिव मिनल पायाळे, उपसचिव सुनिता मस्के, खजिनदार अंजली रणपिसे, आरती कांबळे यांनी नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधू शिंदे, सुनीता साबळे, सुमन क्षीरसागर, वैशाली रणधीर, शुभांगी साबळे, वंदना कांबळे, मीरा कढरे, अंजन काकडे यांनी विशेष प्रयत्न केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


 

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा