पुणे दि. 8 (प्रतिनिधी) उदयगिरी सोशल फाउंडेशन अंतर्गत पुण्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या उदयगीरकरांचे दुसरे स्नेहसंमेलन राष्ट्रसेवा दल, पर्वती पायथा येथे राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व एटीएस सुबाळकर संतोष, मुंबई हायकोर्टाचे वकील एस. एम. पाटील, डॉ.संग्राम पटवारी, श्याम बोथीकर तसेच उदयगिरी सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष आर.पी. माने, उपाध्यक्ष शिव शंकर मोरे, सचिव पार्थ बलसुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून साक्षी काटे हिच्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष आर. पी. माने यांनी केला. या कार्यक्रमांमध्ये पुणे व मुंबईमधील वास्तव्य असणाऱ्या सदस्यांनी आज पर्यंत केलेल्या विविध कार्याची सविस्तर माहिती प्रोजेक्टर द्वारे आर.पी. माने यांनी दिली. कल्याण झांबरे यांनी उदयगिरी करांसाठी निवासासाठी शोधलेल्या,जमिनी व किमती लोकेशन इत्यादी बाबतची माहिती प्रोजेक्टर द्वारे दिली.

सृजन मेहरा यांनी या ग्रुपचा फायदा, फाउंडेशन चे उद्देश याबाबत मार्गदर्शन व उद्भोधन केले. यावेळी श्री आजित शिंदे यांनी उदगीरकरांसाठी कायमच मदत करण्याचे आश्वासन दिले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष शिवशंकर मोरे यांनी भविष्यात करायच्या कार्याची माहिती देताना पुढील वर्षाचे स्नेहसंमेलन पुणे व मुंबई वास्तव्यास असणाऱ्या सर्व सदस्यांचे एकत्रित असेल व ते कर्जत या ठिकाणी होईल असे जाहीर केले. एकूणच स्नेहसंमेलमध्ये सर्व विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये निवासी जमिनी, एकत्रित खरेदी, सेवा प्रधान एकमेकांना अडीअडचणीत मदत, नोकरी, वैद्यकीय मार्गदर्शन या गोष्टींचा समावेश होता. फाउंडेशनचे सर्व आर्थिक व्यवहार रितेश पेंसिलवार यांनी अगदी चोख ठेवले दुसऱ्या दिवशी सर्व हिशोब ही सादर केला त्यांच्या तत्परतेचे आर.पी. माने सरांनी खास कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे रिल्स व व्हिडिओ इत्यादी बनवण्यासाठी जमीन परकोटे यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुचिता जैन यांनी चित्रीकरण करून यूट्यूब,फेसबुक वर प्रसारित केले. स्नेहल कोटलवार आकाश बिराजदार यांनी प्रोजेक्टर इत्यादीची जबाबदारी छान पार पडली.
सदर कार्यक्रमासाठी उदयगिरी सोशल फाउंडेशन चे नंदकुमार पाटील, शिवराज सूर्यवंशी, प्रा. नरेंद्र मेहरा, प्रा.सोमवंशी अर्जुन, माने बी एस, किरण गबुरे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी पागे व अमर सोमवंशी यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार मयूर बागुल यांनी मानले.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
Comments
Post a Comment