तळेगाव नगरपालिकेवर बॉम्ब हल्ला; अग्नीशामक दलाने इमारतीवर मारले पाणी



 तळेगाव दाभाडे : नगरपरिषदेच्या आवारात बुधवारी (दि.७) सायंकाळी ४ वाजता पोलिस व्हॅन आणि इतर वाहने एकापाठोपाठ सायरनचा आवाज करीत शहरात दाखल झाल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. नगर परिषदेच्या इमारतीवर बॉम्ब हल्ला झाला. यानंतर सतर्क झालेल्या प्रशासनाने तातडीने धाव घेत अग्निशमन विभागामार्फत संपूर्ण इमारतीवर पाणी मारत आगीवर नियंत्रण मिळविले. या हल्ल्यात जखमी झालेल्या २९ जणांना तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये १५ पुरुष, १३ महिला आणि एका बालकाचा समावेश होता.



 हे मॉक ड्रिल असून, युद्धजन्य परिस्थितीत उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आल्याची माहिती मावळचे प्रांत सुरेंद्र नवले यांनी दिली. त्यानंतर नागरिकांनी सुस्कारा सोडला. या मॉक ड्रिलमध्ये एनडीआरएफ, सीआरपीएफ, एनसीसी कॅडेट,तळेगाव दाभाडे अग्निशमन दल, वडगाव मावळ अग्निशमन दल, मावळ महसूल विभाग, महावितरण, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, दंगल विरोधी पथक आदींनी संपूर्ण सामग्री, वाहने, सशस्त्र सहभाग नोंदवला. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मारुती मंदिर चौकातून वाहतूक वळविण्यात आली होती.


 तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनार, सचिन कुऱ्हाडे, पोलीस निरीक्षक विशाल पाटील ,गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, वैद्यकीय अधीक्षक बी. आर. पाटील, सॅमसन सोनवणे, मंडल अधिकारी लिंबराज सलगर, कविता मोहमारे उपस्थित होत्या. 


तळेगाव शहराला महत्व तळेगाव शहराची भौगोलिक परिस्थिती तसेच लगत असणाऱ्या सीआरपीएफ कॅम्प, डीओडी डेपो, मिसाईल प्रकल्प, एनडीआरएफ कॅम्प आदींमुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये तळेगावचे शहराचे महत्व खूपच आहे. तळेगाव शहरामध्ये मॉक ड्रिल होणे हे भविष्याच्या दृष्टिकोनातून अधिक फायद्याचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा