नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थिनी सोनल खांदवे-शिंदे यांची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्ग १ पदी नुकतीच निवड

 


तळेगाव दाभाडे दि. १० (प्रतिनिधी)  नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्या विभागातून उत्तीर्ण झालेल्या सोनल खांदवे – शिंदे यांची राज्यसेवा २०२३ परीक्षेमधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्ग १ पदी नुकतीच निवड झाली.


सोनल यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग या विभागात शिक्षण घेतेले असून त्यांनी उत्तम गुणांनी पदवी पूर्ण केली. यापूर्वी यांची महाराष्ट्रात तिसऱ्या आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली होती. सध्या त्या मंत्रालयात औषधी द्रव्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी, आदिवासी प्रकल्प अधिकारी आकाश दिलीप शिंदे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. सोनल यांचे हे यश अथक परिश्रमाचे फळ असून, संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. हे दोघेही मावळ भागातील स्पर्धा परिक्षेंची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.


संस्थेचे अध्यक्ष संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई,अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एस. एन. सपली आदी मान्यवरांनी सोनल यांचे अभिनंदन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा