भारतीय सैन्याने केलेली कामगिरी ही अभिमानास्पद: आनंद छाजेड

 

पुणे दि. 8 (प्रतिनिधी)खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी पुणे येथे महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीनेआपत्ती व्यवस्थापन मूलभूत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेमध्ये आज भारत देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या धरती वरती आधारित आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्णयानुसार तसेच पूर्वनियोजित कार्यक्रम  मॉक ड्रिल प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. 



यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी शत्रूंना जशास तसे उत्तर देणे आवश्यक होते भारतीय सैन्य दलाने जी कारवाई केली त्याबद्दल अभिमान व्यक्त केला. हे शिबिर आपल्या महाविद्यालयात पार पडत आहे याबद्दल कौतुक केले. भविष्यकाळात या शिबिराचा खूप फायदा होईल याबद्दल विश्वास व्यक्त केला. यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना मॉक ड्रील प्रात्यक्षिके दिली. अचानक उद्भवलेल्या आपत्ती वरती कशा पद्धतीने सामना करायचा याबद्दल काही प्रयोग दाखवले. 

यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे संचालक रमेश अवस्थी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सदर उपक्रमाचा प्रशिक्षणार्थींना भविष्यात काय फायदा होणार आहे, तसेच प्रशिक्षणात जखमींना उचलून कसे नेले जाईल व अग्निशामक उपकरणांचे उपयोग कशा पद्धतीने केले जातात आणि अशा आपत्ती परिस्थितीत कशा पद्धतीने कार्य करणे आवश्यक याबद्दल माहिती दिली. तसेच  आपत्ती व्यवस्थापन कार्य हे देश हितासाठी खूपच आवश्यक आहे. 


सर्वांना याचा निश्चित फायदा होईल असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. शरदचंद्र बोटेकर उपस्थित होते. सकाळच्या सत्रामध्ये सदर प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी  डॉ. निलेश काळे यांनी प्रशिक्षणार्थींना आपत्ती आणि आपत्तीचे वर्गीकरण, आपत्तीचे निवारण कशा पद्धतीने केल जाते तसेच  आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे महत्त्व  यावर मार्गदर्शन केले. प्रा. अर्चना तारू यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिबिर पार पडत आहे याचा आनंद सर्व स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी व्यक्त करत आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा