कुंडमळा दुर्घटना 38 जणांचा बचाव : उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

 


तळेगाव दाभाडे दि. 15 (प्रतिनिधी) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आहे.  रविवार, दिनांक 15/06/2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळल्याची घटना घडली असून सदर लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक वर्षा विहारासाठी आले  होते. सदर दुर्घटने मधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1)पवना रुग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान 02 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पूलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात एकूण 03 व्यक्ती अडकले असल्याचे प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMRDA चे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा