खडकीच्या टिकाराम जगन्नाथ ला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा

 

  पुणे दि. 10 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयास नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून पुढील दहा वर्षासाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा बहाल करण्यात आला अशी माहिती संस्था अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली. 



  खडकी शिक्षण संस्थेची स्थापना १९१३ साली झाली. त्यानंतर १९८३ साली तत्कालीन संस्था अध्यक्ष एडवोकेट एस के जैन व चिटणीस स्व. एडवोकेट चंद्रकांत जी छाजेड यांचे प्रयत्नाने टीकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमध्ये कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाने माणिक महोत्सव साजरा केला असेही गोयल म्हणाले. 




  संस्थाध्यक्ष श्री.कृष्णकुमार गोयल यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शाखांच्या विकासाबरोबरच वरिष्ठ महाविद्यालयाचा परिपूर्ण विकास करण्यात आलेला आहे. तसेच महाविद्यालय स्वायत्त झाल्याने या शैक्षणिक वर्षांमध्ये बीएससी डेटा सायन्स, बीएससी इंटेरियर डिझाईन, बीएससी सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक, बीएससी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीएससी  एनिमेशन, तसेच बीए इन सिव्हील सर्विसेस, बीए इन नाट्यशास्त्र हे कोर्सेस नव्याने सुरू करण्यात येत आहेत. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले. यावेळी सचिव आनंद छाजेड उपस्थित होते. 

  यावेळी उपप्राचार्य प्रा महादेव रोकडे, डॉ. सुचेता दळवी, प्रा राजेंद्र लेले, प्रा जुगल नाईक, डॉ. काळे निलेश, डॉ. अविनाश कोल्हे उपस्थित होते. परीक्षा विभागप्रमुख डॉ.डी.एम. मुपडे, डॉ. नागेंद्र जंगम, डॉ. प्रकाश पांढरपिसे, डॉ महेश बेंडभर, कार्यालय अधीक्षक श्री लक्ष्मण डामसे हे उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा