अध्यापक महाविदयालयात माजी विदयार्थी मेळावा संपन्न

 

वडगाव मावळ दि. 11 (प्रतिनिधी) येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविदयालय वडगाव मावळ मध्ये दि.११/६/२०२५ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत माजी विदयार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी महाविदयालयातील बी. एड व एम. एड. चे प्रशिक्षण पुर्ण केलेले  सन 1990- 91 ते 2023- 24 या 34 वर्षातील महाराष्ट्रभरातून आलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास हजेरी लावली. 




कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सर्व पाहुणे व माजी विद्यार्थ्यांचे संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहा. प्रा. महादेव सांगळे यांनी 34 वर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल वाचन केला.
 त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देवून नवीन विचारांची देवाण घेवाण केली. यामध्ये माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील, सदस्य उत्तम केंदळे, प्रवीणकुमार हुलावळे व बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालया बाबत कृतज्ञता व्यक्त केली.



 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून टिळक शिक्षण महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. विजय धामणे हे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या विकासातील योगदान यावर माहिती सांगितली, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव अशोक बाफना हे होते त्यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा सांगितला.




 यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सदस्य चंदुकाका ढोरे, राज खांडभोर, अरणेश्वर अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. वैशाली शिंदे, टिळक शिक्षण महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. चंदन शिंगटे हे उपस्थित होते.




 महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता धायगुडे व माजी विदयार्थी संघाचे सचिव सहा. प्रा. सांगळे महादेव आणि आय. क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. देवळालकर शीतल, डॉ.कविता तोटे, डॉ.संदीप गाडेकर, सहा.प्रा. ज्योती रणदिवे , सहा.प्रा.सोनाली पाटील, सहा. प्रा. शबनम मोकाशी,  विभागातील डॉ. दीपा नवसे, सहा.प्रा.विजय तोडकरी, सहा.प्रा.संध्या घोडके, ग्रंथपाल  सुजाता जाधव, मोहन कडू, सुरेश घोजगे, मंगल हिंगे, सोमनाथ घोंगडे, संतोष ढमाले, विनायक येळवंडे यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शीतल देवळालकर यांनी तर आभार प्रदर्शन सहा.प्रा. ज्योती रणदिवे यांनी केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा