ॲड् पु.वा. परांजपे विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

तळेगाव दाभाडे दि. १६  (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष सन  २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित मुख्याध्यापक  पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका भेगडे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात व प्रत्येकाच्या हाती रोप देऊन तसेच विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.यावेळी पालक बहुसंख्येने  उपस्थित होते. शाळेमध्ये  विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी  सजावट करण्यात आली होती. 


     दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व वृक्षपूजन मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका  रेखा भेगडे, तसेच सर्व ज्येष्ठ अध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले.
      प्रास्ताविकामध्ये  शाळेतील शिक्षिका दिप्ती बारमुख मॅडम यांनी शाळेस प्राप्त झालेल्या गुणवत्ता संवर्धन अभियान तालुकास्तरीय प्रथम आणि जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार  याविषयी माहिती दिली. तसेच शाळेची होत  असणारी प्रगती ,शाळेच्या सोयी- सुविधांविषयी , नव्याने मुला- मुलींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृह  व संस्थेने दिलेल्या रोपांविषयी व संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी माहिती सांगून प्रत्येकाने आपल्या घरी रोप लावणे व ते वाढवणे त्याचे संवर्धन करणे याविषयी सांगितले.शाळेचा एसएससी बोर्डाचा निकाल सांगून एसएससी  परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे  कौतुक केले.



शाळेतील नवोगतांचे स्वागत सौ सुवर्णा काळडोके यांनी केले. तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या अनेकविध उपक्रमांची माहिती अनिता नागपूर यांनी दिली. 
  इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे महेश महाजन यांच्या हस्ते शासनामार्फत  देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले. एक मुल एक झाड  या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी या प्रकल्पांतर्गत  विद्यार्थ्यांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक पांडूरंग पोटे यांनी शाळेच्या विकासाचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला. मराठी माध्यमाच्या शाळा या नेहमीच गुणवत्ता संवर्धनासाठी अग्रसर असतात असे मत विद्यार्थी स्वागतोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश महाजन यांनी व्यक्त केले.  


          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे प्रभा  यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा