महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासात तळेगाव दाभाडेचा वेगळा ठसा : डॉ.सदानंद मोरे. नाट्य परिषदेच्या वतीने पं. सुरेश साखवळकर व डॉ. मीनल कुलकर्णी यांचा सन्मान

 

तळेगाव दाभाडे दि.१६ (प्रतिनिधी) : 
महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासात तळेगाव दाभाडे शहराने वेगळा ठसा उमटवला आहे. या शहराने रंगभूमिला चांगले कलाकार दिले आहेत, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.    


             
          आखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे विश्वस्त, जेष्ठ गायक पं. सुरेश साखवळकर यांना आखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मध्यवर्ती शाखेच्या वतीने मुंबईत आयोजित कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने, तर नृत्य अभ्यासक डॉ. मीनल कुलकर्णी यांना बालरंगभूमीवरील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. त्यानिमित्त त्यांचा तळेगावकर रसिक व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष नरेश गडेकर, कार्यकारी समिती सदस्य विजयकुमार साळुंके, तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्षा डॉ. अपर्णा महाजन, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी,चंद्रकांत भिडे, डॉ. वर्षा वाढोकर, विलास काळोखे, भगवान शिंदे, उमाकांत कुलकर्णी, राजीव कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



        पं. सुरेश साखवळकर यांनी संगीत रंगभूमीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत राहणार असून, या पुरस्काराने आपल्यावरील जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. 
        तळेगावच्या कलाकारांचा सन्मान केल्याबद्दल डॉ. मीनल कुलकर्णी यांनी नाट्य परिषदेचे आभार मानले व हा आपला वैयक्तिक सन्मान नसून, तळेगाव दाभाडे शहराचा सन्मान असल्याच्या भावना व्यक्त केल्या. 
        परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचे कार्य उत्तम चालले असून, शाखेला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन भाऊसाहेब भोईर यांनी दिले. संगीत नाटकांनी कालानुरूप बदल करायला हवा, असे मत नरेश गडेकर यांनी व्यक्त केले. 



         कार्यक्रमानंतर स्थानिक कलाकारांच्या नाट्यसंगीत गायनाची मैफिल झाली. यामध्ये निशा अभ्यंकर, शेखर व्यास, सुधीर राणे इनामदार, श्रुती आफळे देशपांडे, स्वरदा रामतीर्थकर यांनी सुरेल सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली, तर मैफिलीची सुरेल सांगता पं. सुरेश साखवळकर यांनी ‘आगा वैकुंठीच्या राया ....या भैरवीने केली. या मैफिलीला संगीत साथ विनय कशेळकर, केदार कुलकर्णी (तबला) व प्रिया करंदीकर-घारपुरे(संवादिनी) व टाळ संगत सुरेश कुलकर्णी यांनी केली.


        दरम्यान, अहमदाबाद येथील विमान अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या, तसेच कुंडमळा येथील दुर्घटना आणि केदारनाथ येथील हेलीकॉप्टर दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
        कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळेगाव नाट्यपरिषदेच्या संजय वाडेकर, नितीन शहा, नयना डोळस, डॉ. मिलिंद निकम, राजेश बारणे, सुमेघ सोनावणे, तानाजी मराठे, दीपाली पाटील, सुरेश दाभाडे, बाळासाहेब गायकवाड, विदुर महाजन, यांनी परिश्रम घेतले.
        सूत्रसंचालन डॉ. मिलिंद निकम आणि राजेश बारणे यांनी, तर आभार संजय वाडेकर यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा