श्री एकविरा विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात वृक्ष रोप देऊन विद्यार्थांंचे स्वागत

 


कार्ला दि. १६ (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील शाळा आज  सोमवार पासून सुरु झाल्याअसून शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वच शाळांमधून नवागतांचे वृक्ष रोपे देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले.



कार्ला येथील  श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती  लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर काॕलेज मधील   नव्यानेच प्रवेश घेतलेले  शाळेतील सर्व विद्यार्थी यांचे गुलाब पुष्प वृक्ष रोपे देऊन  ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.



यावेळी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या इयत्ता ५ वी ते ८ वी शालेय पाठ्य पुस्तक देखील मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
यावेळी कार्ला गावचे उपसरपंच अभिषेक जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,प्राचार्य संजय वंजारे,सागर येवले शिक्षक प्रतिनिधी संजय हुलावळे,मच्छिंद्र बारवकर,उमेश इंगूळकर,विवेक भगत,सचिन हुलावळे,अनिल चौधरी,नरेंद्र इंदापुरे,गणेश बोंबले,बाबाजी हुलावळे,रोहिदास वाघवले,वैजयंती कुल,संगीता खराडे,अलका आडकर,रंजना नवाळे,काजल गायकवाड,श्रद्धा मोहळ वैजयंता शेवाळे यांंच्यासह सर्व शिक्षक  व शिक्षेके-तर कर्मचा-यांनी स्वागत केले.


संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे ,उपाध्यक्ष गणेश खांडगे सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश म्हस्के कार्ला शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांनी विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा