कंपन्यांकडून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे - श्रीकांत भोंगाळे

 


टाकवे बुद्रुक दि. ५ (प्रतिनिधी) - येथील  केएसपीजी कंपनीच्या वतीने टाकवे ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभुमी परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले 
यामध्ये काही वनस्पती व फळाची आदीझाडीची शंभर पेक्षा अधिक रोपे लावण्यात आली आहे यावेळी केएसपीजी कंपनीचे मॅनेजर श्रीकांत भोंगाळे साहेब यांनी टाकवे एमआयडीसी औद्योगिक बेल्ट होत असताना कंपन्यांकडून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घेऊन पर्यावरण स्वसंरक्षणाची जबाबदारी घेण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.



गावातील नागरिकांनसाठी कंपनीच्या माध्यमातून वृक्षरोपे उपलब्ध करून दिली जातील आपल्या घराच्या परिसरात वृक्षारोपण करुन ज त्यांचे संगोपन करा असे आवाहन युवराज पवार यांनी केले. कंपनीच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या रोपांची देखभाल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येईल असे आश्वासन सरपंच अविनाश असवले यांनी दिले.

 


वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केएसपीजी कंपनीचे मॅनेजर श्रीकांत भोंगाळे, युवराज पवार, सरपंच अविनाश असवले मा.उपसरपंच परशुराम मालपोटे, कंपनी युनियन अध्यक्ष सनी भानुसघरे, उपाध्यक्ष प्रशांत असवले, सचिव दिनेश असवले यासह कंपनी कामगार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

 



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर