रामभाऊ परुळेकर शाळेत च्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

 

तळेगाव दाभाडे दिनांक 16 प्रतिनिधी बालमोहन संस्थेच्या रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन तळेगाव दाभाडे या माध्यमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2025- 26 साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अहमदपूर व स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या गुलाबपुष्प देऊन त्याचप्रमाणे पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले. 


शाळेने आयोजित केलेल्या स्वागत समारंभा साठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षा तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या संचालिका, पदाधिकारी व विश्वस्त असलेल्या शाळेच्या माजी शिक्षिका स्नेहलता दत्तात्रेय बाळसराफ यांना निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना स्नेहलता बाळसराफ यांनी शाळेमधून मिळत असलेले आधुनिक शिक्षण व संस्कार याचा वसा व वारसा जपण्याचे आवाहन केले. पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना मोबाईल व स्वयंचलित वाहन देऊ नये, विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन यावर भर द्यावा. अभ्यासाबरोबर अभ्यासेतर उपक्रमांत सहभागी होण्यास प्रवुत्त करावे.



संस्थेचे विश्वस्त नंदन रेगे यांनी स्नेहल बाळसराफ यांचा सत्कार केला. प्रास्तविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक दीपक फोंडके यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. शाळेची शिस्त अबाधित ठेवण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे सांगून शाळेमार्फत आयोजित केलेल्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकास करावा असे सांगितले. 

शाळेचे पर्यवेक्षक दत्तात्रेय जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. याप्रसंगी शाळेचे कलाशिक्षक संजीव जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे विश्वस्त नंदन रेगे व स्नेहलता बाळसराब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा