इंद्रायणी महाविद्यालय व जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू

 


तळेगाव दाभाडे दि.१२ (प्रतिनिधी) "ज्ञानदेवे रचिला पाया" या ब्रीदवाक्यासह तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षणाचा वसा घेऊन पोहोचण्याचे काम इंद्रायणी वि‌द्यामंदिर संचालित इंद्रायणी महावि‌द्यालय गेली अनेक दशके करीत आहे आणि तळेगाव दाभाडे येथील जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी ही प्रशिक्षण संस्था आपल्या माध्यमातून तळेगाव दाभाडे परिसर आणि मावळ तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय अधिकारी होण्याची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा आहे अशा वि‌द्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी व मार्गदर्शन वर्ग आयोजित करीत आहे.



यासाठी इंद्रायणी महाविद्यालय परिसरात आधुनिक डिजिटल सुविधांनी सुसज्ज असे क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब, संदर्भ ग्रंथ आणि नियतकालिकांनी परिपूर्ण असलेले वाचनालय इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहे. या शासकीय परीक्षांसाठी जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी यांच्याकडे अनुभवी शासकीय अधिकारी आणि उत्तमोतम प्राध्यापक अशा फॅकल्टीज् उपलब्ध आहेत.



केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाईलच. त्याचप्रमाणे "इन्स्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शन" (आयबीपीएस), स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी देखील लवकरच क्लासेस सुरु होत आहेत. या क्लासेस मध्ये परीक्षांची पूर्ण तयारी सिलॅबसप्रमाणे करून घेण्यात येईल.
प्रति आठवड्याला विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा देखील घेतल्या जातील. जेणेकरून वि‌द्यार्थ्यांचा या परीक्षांसाठी नियमित सराव होईल.



जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी यांना यासाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या अनुभवी प्राध्यापक वर्गाचे आणि इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे पदाधिकारी विशेषतः अध्यक्ष महोदय श्रीमान रामदास काकडे साहेब आणि सेक्रेटरी महोदय श्रीमान चंद्रकांत शेटे साहेब यांचे पूर्णपणे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे.
अलीकडच्या काळात स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयबीपीएस द्वारा अनुक्रमे 2400 आणि 4000 एवढ्या अधिकारी व कर्मचारी तसेच अप्रेंटिस यांच्या जागा भरतीसाठी साठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध राष्ट्रीयकृत बँका, इन्शुरन्स कंपन्या, रिझव्हे बैंक ऑफ इंडिया आणि रेल्वेतील बिगर तांत्रिक पदांसाठी मोठ्‌या प्रमाणात भरती होणे अपेक्षित आहे.



त्याचप्रमाणे नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या‌द्वारे सुमारे 4700 पदांसाठी विशेषतः स्थापत्य अभियंता, संगणक अभियंता, पाणीपुरवठा व जलनिः स्सारण अभियंता, विद्युत अभियंता, करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी, लेखापरीक्षा व लेखा अधिकारी, अग्निशमन अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक या पदांसाठी लवकरच मेगा भरती होणार आहे.
या सर्व परीक्षांसाठी इंद्रायणी महाविद्यालय आणि जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी या संस्थेमार्फत तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरु होत आहेत.



था संपूर्ण उपक्रमाला तळेगाव दाभाडे शहरातील सन्माननीय पदाधिकारी आणि अधिकारी तसेच मावळ तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी यांना सहकार्याचे आवाहन करीत आहोत. जेणेकरून तळेगाव दाभाडे परिसर व मावळ तालुक्यातील या परीक्षांची तयारी करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आणि त्यांना या परीक्षेत अव्वल मार्कानी उत्तीर्ण होण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल अशी माहिती प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, माजी अधिकारी  व जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी संचालक सुधीर राऊत व संस्थेचे सचिव मा. चंद्रकांत शेटे यांनी दिली.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा