डॉ.पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिम्मित वृक्षारोपण मोहीम

पुणे दि. 7 (प्रतिनिधी) एम. सी. इ.  सोसायटी, डॉ.पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे दिनांक ५ जुन २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिम्मित वृक्षारोपण मोहीम विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात, आझम कॅम्प पुणे येथे राबविण्यात आली.



या प्रसंगी एम. सी. इ.  सोसायटी च्या उपाध्यक्षा  आबेदा इनामदार, एम. सी. इ.  सोसायटी चे सचिव प्रा. इरफान शेख , खजिनदार मुजफ्फर शेख, अब्बास सर , विद्यापीठाचे कुलसचिव धनंजय पाळणे आणि विद्यापीठातील  महाविद्यालयांचे अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. अनिता बेलापूरकर, डॉ. रोशन काझी, डॉ. लीना देबनाथ, आदि  मान्यवर उपस्थित होते.


 तसेच विद्यापीठाचे प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी हे या वृक्षारोपण मोहिमेत सामील झाले. डॉ .रजत सय्यद यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक म्हणून या मोहिमेचे काम पाहिले.डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ शाश्वतता आणि पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. वृक्षारोपण मोहीम ही विद्यापीठाच्या हिरवेगार आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या सततच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा