पैसाफंड प्राथमिक शाळेत ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न



   तळेगाव दाभाडे दि. 17 (प्रतिनिधी) सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पैसाफंड प्राथमिक शाळा तळेगाव दाभाडे येथे ढोल ताशांच्या गजरात नवागतांचे  स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


     शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सेल्फी पॉईंट  व लाईव्ह कार्टून्स अशी खास तयारी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनिता लादे मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.



 संस्थेचे सन्माननीय सचिव संतोषजी खांडगे साहेब यांच्या कल्पनेतून साकारलेला पर्यावरण संरक्षण या उपक्रमानिमित्त एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना  व उपस्थित पालकांना रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीतील सदस्य तसेच पालक  उपस्थित होते. 



शालेय समितीचे अध्यक्ष विनायकजी अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या  तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ विभागात सुरेखा हांडे व ब विभागात आशा लबडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अ विभागात अर्चना शेरे व ब विभागात प्रीती बारमुख यांनी केले.  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून नवागतांचे स्वागत प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा