श्री. छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज कान्हे प्रशालेत इयत्ता आठवीच्या वर्गातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

 

तळेगाव दाभाडे दि. १६ (प्रतिनिधी) नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित श्री. छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज कान्हे  प्रशालेत इयत्ता आठवीच्या वर्गातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.



 शैक्षणिक वर्ष 2025 26 ची सुरुवात आज दिनांक 16 जून 2025 रोजी झाली. या वर्षात शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून ढोल ताश्याच्या गजरात व मान्यवरांच्या उपस्थित गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. शैक्षणिक इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे व रोपांचे वाटप मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. 



याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी लाखे सर त्यांच्याबरोबर कान्हे गावचे सरपंच विजयराव सातकर व  समीर सातकर , ज्येष्ठ नागरिक बंडोबा सातकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

या शैक्षणिक वर्षात नू. म. वि. प्र. मंडळ तळेगाव दाभाडे संस्थेचे अध्यक्ष  संजय तथा बाळाभाऊ भेगडे संस्थेचे उपाध्यक्ष  गणेश शेठ खांडगे, संस्थेचे कार्यकुशल व उपक्रमशील सचिव संतोषजी खांडगे साहेब उपसचिव  नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के तसेच श्री. छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज कान्हे शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री. यादवेंद्रजी खळदे साहेब व सर्व पदाधिकारी दरवर्षी संस्थेच्या सर्व शाळांमध्ये नवीन उपक्रम राबवित असतात.


 दरवर्षी प्रमाणे एक विद्यार्थी एक झाड असा नाविन्यपूर्ण पर्यावरण पूरक उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक झाड देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ते झाड त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या घरी शेतात किंवा शालेय परिसरात लावून त्याची जोपासना करावी. असा मोलाचा संदेश संस्थेचे सचिव खांडगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना दिला. सरपंच विजय सातकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाची उत्साहात व जल्लोषात सुरुवात झाली. 



कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सविता चव्हाण,  संतोष हुलावळे,  रियाज तांबोळी, सोमनाथ साळुंके, श्रद्धा मोहोळ, वर्षा गुंड, श्रद्धा तुपे, कविता ढोरे , सीमा ओव्हाळ , किरण गवारे, लक्ष्मण सातकर, राजेंद्र भालेकर  या सर्वांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सोमनाथ साळुंके यांनी केले. तसेच आभार सविता चव्हाण यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा