इंद्रायणी महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला




तळेगाव दाभाडे दि. 23 (प्रतिनिधी) नुकताच जगभर 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन दिन(World youth skills day)  म्हणून साजरा करण्यात आला. जागतिक स्तरांवर देशाची ताकद वाढवायची असेल तर युवकांमध्ये कौशल्य असणे फारच गरजेचे आहे... पदवी बरोबर कौशल्य व कौशल्या बरोबर आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाबरोबर राष्ट्रनिर्मितीचा दृष्टिकोन असल्यास आपला भारत देश नक्कीच रोजगाराभिमुख कौशल्य प्रधान देश होईल यात शंका नाही. 





15 जुलै या दिवसाचे औचित्य साधून इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे तंत्र शिक्षण विभागा तर्फे विज्ञान विभागातील व तंत्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यां साठी एक दिवसीय एलईडी मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 





 एलईडी तयार करण्याचे ट्रेनिंग तंत्रशिक्षण विभागातील माजी विद्यार्थी श्री. सुरज सिद्ध गवळी यांनी दिले.या कार्यक्रमासाठी इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री एस पी भोसले सर तंत्र शिक्षण विभाग प्रमुख श्री. एन टी भोसले सर, विज्ञान विभाग प्रमुख श्री. खाडप सर, श्री. गोरख काकडे सर, प्रा. कावेरी मॅडम,  श्री.भुजबळ सर तसेच विज्ञान विभागातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निता अहिरे मॅडम यांनी केले तर आभार श्री. घोडके सरांनी मानले.
या एक दिवसीय वर्कशॉप साठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग बघायला मिळाला आणि एलईडी बल्ब बनवण्याचा विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी मनमुराद आनंद घेतला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा