कै. कृष्णराव भेगडे विचारांचे विद्यापीठ - श्री. रामदास काकडे

 

तळेगाव दाभाडे दि.७ (प्रतिनिधी) कै. कृष्णराव भेगडे हे विचारांचे विद्यापीठ होते. माणूस मोठा झाल्यानंतरही जमिनीवर पाऊल ठेवून कसा वावरतो हे कृष्णराव भेगडे साहेबांकडून शिकावे. 1972 साली आदिवासींच्या विकासासाठी मावळात भेगडे साहेबांनी दिलेले योगदान कालातीत आहे. विधानमंडळातील कृष्णराव भेगडे यांची भाषणे नवशिक्य आमदारांना अभ्यासासाठी आहेत, ही त्यांच्या वैचारिकतेची खोली आहे. आरोग्य, उद्योग, शेती, शिक्षण, समाज यांची सखोल जाण असलेल्या नेता म्हणून भेगडे साहेबांचे कार्य कालातीत आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर त्यांचे अद्वितीय काम आहे. त्याचबरोबर चाकण, तळेगाव एमआयडीसी उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 
अशी उद्गार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे यांनी काढले ते आज इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा सभागृहात आयोजित कै. कृष्णराव भेगडे यांच्या श्रद्धांजलीपर सभेत बोलत होते.




यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे, सदस्या निरूपा कानिटकर, संदीप काकडे, युवराज काकडे, संजय साने, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डॉ. गुलाब शिंदे, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, कांतीलाल शहा विद्यालयाच्या प्राचार्या, संस्था पदाधिकारी, संस्थेच्या शाळेतील शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना काकडे म्हणाले की,
"तळेगावचे नाव जगाच्या नकाशावर कोरणारा दूरदृष्टीचा नेता म्हणून कृष्णराव भेगडे यांचा आदराने उल्लेख करावाच लागतो. तळेगाव पॅटर्न तयार करून तो देशभर राबवण्याचे श्रेय कृष्णराव भेगडे यांचेच आहे." 


कै. कृष्णराव भेगडे यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करताना श्री. चंद्रकांत शेटे म्हणाले की, "भेगडे साहेब तळेगाव शहराचे कार्यवाह होते. तळेगावची संस्कृती जपली पाहिजे, यासाठी त्यांनी सतत अट्टाहास धरला. नागरिकांचे वर्तन कसे असावे यांचा त्यांनी आदर्श वस्तू पाठ घालून दिला. जनसंघ ते काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात भेगडे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, हे सांगताना भावुक झाले. भेगडे साहेबांचा पराभव झाला, त्यावेळी तळेगावात एकही चूल पेटली नाही एवढा जिव्हाळा असणारा नेता हरपल्याची" भावना श्री. चंद्रकांत शेटे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर मनोगतातून आदरांजली समर्पित केली. 



यावेळी कांतीलाल शहा विद्यालयातील शिक्षिका सुलोचना इंगळे, संत तुकाराम महाविद्यालय शिवणे येथील रवींद्र शेळके, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागप्रमुख प्रा. उत्तम खाडक, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, प्राचार्य संजय आरोटे, डॉ. संभाजी मलगे, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, सुरेश चौधरी, लोकमतचे पत्रकार विलास भेगडे, गडसिंग साहेब, निरुपा कानिटकर, संदीप काकडे, आदींनी कै.  कृष्णराव भेगडे यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करून त्यांना आदरांजली समर्पित केली.
प्रा.आर. आर. डोके आणि विजय खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर