मोबाईलचा अतिरेक टाळा: विलास भेगडे

 

तळेगाव दाभाडे दि. 29 (प्रतिनिधी): मोबाईलमुळे संवाद हरवत चालला असून मीडियाच्या युगात मुलांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.मुले-मुली मोबाइलचा अतिरेक वापर करतात. तो टाळला पाहिजे. गुणवंत विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन  तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे यांनी केले.



राधा कल्याणदास दर्यानानी चारिटेबल ट्रस्ट संचलित साईबाबा प्रकल्प कान्हे, मावळ येथे शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करताना ते बोलत होते. यावेळी नॅशलिस्ट  डिटेक्टिव्ह फोर्सचे सीनियर ऑफिसर
प्रफुल्ल झांबरे, ज्युनियर ऑफिसर अक्षय भोसले, बालाजी भोई, ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब काळे, सतर्क महाराष्ट्राच्या संपादिका रेखा भेगडे, प्रकल्प प्रमुख डॉ. स्वाती वेदक, सोशल वर्कर अर्चना पिंगळे, दत्तात्रय चांदगुडे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. 



मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सदानंद भगवान दळवी व स्वर्गीय लक्ष्मण माधवदास वाधवानी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.
आकाश पुंडलिक पुजारी (श्री छत्रपती शिवाजी विद्यालय , कान्हे), अनिश अविनाश कदम (इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय, तळेगाव दाभाडे) या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.इयत्ता १०वीच्या परीक्षेत ग्रामीण भागातून न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेडचा विद्यार्थी सार्थक बाळासाहेब मोरे याला ९६.६० गुण मिळाल्याबद्दल तसेच इयत्ता १२वीच्या परीक्षेत कोथुर्णे येथील कै. श्रीमती सरूबाई पांडुरंग दळवी जुनियर कॉलेजची विद्यार्थिनी अस्मिता अंबु निंबळे हिला ९० टक्के गुण मिळाल्याबद्दल त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. 



मान्यवरांच्या हस्ते तहमिना वार्मा सेंटर(एस.ई.सी.) नायगाव, नाणे माध्यमिक विद्यालय- नाणे, जिल्हा परिषद शाळा- कोथुर्णे, अहिरवडे, बेडसे या पाचही शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मार्गदर्शन करताना प्रफुल्ल झांबरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत. आई - वडील तसेच आपल्या शाळेचे नाव मोठे करावे. वडिलधाऱ्या माणसांचा आदर राखावा.



अभ्यासातील सातत्य,जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते. साईबाबा सेवाधाम प्रकल्प कान्हे, मावळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ चौपाटी, मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. स्वागत आणि प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख डॉ. स्वाती वेदक यांनी केले.अक्षय भोसले, बालाजी भोई ,काकासाहेब काळे, रेखा भेगडे  यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. विद्यार्थ्यांच्या वतीने अनिश कदम,सार्थक मोरे, अस्मिता निंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. विशाल वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.


 अर्चना पिंगळे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे संयोजन महेंद्र पाटील, पुरुषोत्तम खर्चे महाराज, भाऊ मुंडे ,सुनील सातकर, लक्ष्मण गजभिव ,मारुती गावडे, टीकाराम सोनार ,अशोक अंगारके ,चंद्रकांत पराठे ,अशोक सानप ,शिवाजी सानप, अशोक गोरखा, सुनील चंदनशिवे, दत्ता मुंडे यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay





Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर