व्ही. पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापकांनचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग

 

लोणावळा दि. 18 (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयातील मा. प्राचार्य आणि प्राध्यापकांनी दि.१७ जुलै २०२५ रोजी ICT for Sustainable Development (ICT4SD) वरील १० व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला गोवा येथे हजेरी लावली. या कॉन्फरन्समध्ये अनेक विद्वानांनी पॅनेल सत्रांमध्ये भाग घेतला व लेखक आणि सह-लेखन पेपर सादर केले आणि संपूर्ण कॉन्फरन्समध्ये रचनात्मक अभिप्राय प्रदान करणारे चर्चाकार म्हणून काम केले.

 महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. मानव अ. ठाकूर, डॉ. हरीश हरसूरकर (HOD, Mechanical), प्रा. हुसेन शेख (HOD , Applied Science) आणि इतर महाविद्यालयीन प्राध्यपकानी मशीन लर्निंग, ऑटोमोबाईल, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्ट्रक्चरल डिझाईन यासह विविध विषयांमध्ये आपल्या महाविद्यालयाने अकरा पेपर प्रकाशित करून आपले योगदान दिले. 

             यंदाच्या कॉन्फरन्समध्ये मा. प्राचार्य डॉ. मानव अ.ठाकूर व डॉ. हरिष हरसुरकर यांना  सेशन चेअर म्हणून सन्मान मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके तसेच सर्व सभासदांनी आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर