अध्यापक महाविदयालयात माजी विदयार्थी मेळावा संपन्न
वडगाव मावळ दि. 11 (प्रतिनिधी) येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविदयालय वडगाव मावळ मध्ये दि.११/६/२०२५ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत माजी विदयार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी महाविदयालयातील बी. एड व एम. एड. चे प्रशिक्षण पुर्ण केलेले सन 1990- 91 ते 2023- 24 या 34 वर्षातील महाराष्ट्रभरातून आलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास हजेरी लावली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सर्व पाहुणे व माजी विद्यार्थ्यांचे संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहा. प्रा. महादेव सांगळे यांनी 34 वर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल वाचन केला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देवून नवीन विचारांची देवाण घेवाण केली. यामध्ये माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील, सदस्य उत्तम केंदळे, प्रवीणकुमार हुलावळे व बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालया बाबत कृतज्ञता व्यक्त ...






Comments
Post a Comment