देशमुख विद्यालय देवघर येथे पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

 


देवघर दि. 27 (प्रतिनिधी) : स्वर्गीय वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय देवघर येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालकमेळाव्याला इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लक्षणीय  उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये विविध विषयांवर संवाद साधला गेला.


श्री.हुलावळे प्रविणकुमार सर यांनी मार्च  2025 चा इयत्ता दहावीचा निकाल, शालेय शिस्त, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2005,शाळेतील विविध उपक्रम उपक्रम ,शालेय गणवेश आणि शाळेत स्थापन करण्याच्या  वेगवेगळ्या समित्या, मनशक्ती प्रयोगाकेंद्र लोणावळा द्वारा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारे विविध उपक्रम, मॅजिक बस फाउंडेशन चा उपक्रम ,टाटा पॉवर चा पर्यावरण विषयक उपक्रम याविषयी पालकांशी संवाद साधला व माहिती दिली. 



श्री.विजय कचरे सर  यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये शिक्षकांबरोबर पालकांचीही भूमिका कशी महत्त्वाची असते याविषयी मार्गदर्शन केले तसेच  शालेय पोषण आहार याची माहिती दिली.सौ.ठिकेकर मनीषा मॅडम यांनी विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्व आणि नियमित अभ्यासाने मिळणारे यश व सहशालेय परीक्षा यांचे विध्यार्थी जडणघडणीमधील महत्व सांगितले. 

मुख्याध्यापक श्री .पाटील सर यांनी 'विध्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू आहे , विकसित भारताचा नागरिक आहे त्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांनीही त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असणे आवश्यक आहे , असे मार्गदर्शन केले. उपस्थित पालकांनीही स्वयंस्फूर्तीने आपली मनोगते मांडली, विविध मुद्यांवर सूचना दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री.प्रविणकुमार हुलावळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. नवनाथ देशमुख यांनी केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा