भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य डॉ. बापूसाहेब गणपत चौगुले यांना प्रदान

पुणे दि. 27 (प्रतिनिधी) ए.डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा ग.दि. माडगुळकर नाट्यगृह आकुर्डी पुणे येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.



सदर कार्यक्रमामध्ये श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे २ चे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब गणपत चौगुले यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बापूसाहेब गणपत चौगुले हे गेली ३० वर्ष अध्यापक महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत. ते गेली १० वर्षापासून महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. बापूसाहेब गणपत चौगुले यांनी विविध शाळा महाविद्यालया मध्ये सामाजिक विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखली ३ विद्यार्थी Ph.D व ९ विद्यार्थ्यांनी M.Phil पदवी संपादन केली आहे. त्यांची बी.एड., डी.एड. व एम.एड. अभ्यासक्रमावर आधारित ४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध राष्ट्रीय व राज्य स्तरावरील चर्चासत्रे, कार्यशाळा मध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांचे आत्तापर्यंत ३५ संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी पथनाटयांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. त्यांना आत्तापर्यंत जवळजवळ १७ आदर्श शिक्षक व ५ आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाले आहेत.


सदर कार्यक्रमास मा. श्री अनिल जाहीर, संस्थापक अध्यक्ष तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ह. भ.प. तुकारामबाबा महाराज मठाधिपती संत बागडे बाबा आश्रम संख, मा. वैशाली मार्तंड चव्हाण, सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका, मा. श्री. राम मांडुरंके अतिरिक्त पोलिस आयुक्त पुणे तसेच ए.डी. फाउंडेशन अध्यक्ष मा. अशोक गोरड व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. त्यावेळी महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, अध्यात्मिक, कृषी, वैद्यकीय अशा क्षेत्रातील निवडक मान्यवरांचा मानपत्र, पदक व ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.



प्राचार्य डॉ. बापूसाहेब गणपत चौगुले यांच्या या सन्मानाबद्दल श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सर्व मा. पदाधिकारी व इतर सदस्यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच अध्यापक महाविद्यालयाच्या आजी व माजी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी अभिनंदन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay





Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा