मस्तक सशक्त करणारं पुस्तक... - प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

 

तळेगाव दाभाडे दि. 16 (प्रतिनिधी)

"सखोल, समीक्षात्मक वाचनाने मनाची मशागत होत असते. चांगली पुस्तके वाचल्याने आपले मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेले मस्त मग कोणापुढेही विनाकारण नतमस्तक होत नाही. म्हणून माणसाने पुस्तके आवर्जून वाचली पाहिजे." असे उद्गार इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी काढले. ते काल तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

 यावेळी वडगाव न्यायालयात वकिली करणारे ॲड. मधुकर रामटेके लिखित 'जमीन जुमला' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. संभाजी मलगे यांच्या हस्ते झाले.  यावेळी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे, संस्थापक विलास भेगडे, सचिव केदार शिरसट  कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे, खजिनदार अंकुश दाभाडे, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, सल्लागार विवेक इनामदार, गोरख काकडे, ॲड. मधुकर रामटेके, प्रा. आर. आर. डोके, प्रा. डॉ.  संदीप कांबळे, डॉ. संदीप गाडेकर, राधाकृष्ण येणारे, रमेश फरताडे, बद्रीनारायण पाटील, सुरेश शिंदे, अमित भागीवंत, मयूर सातपुते आधी पत्रकार प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


पुढे बोलताना मलघे म्हणाले, " जमीन जुमला या पुस्तकातून कुळ कायदा, महार वतन कायदा, हिंदू वारसा कायदा, मुलींचा वारसा कायदा, आदींबाबत सखोल आणि अद्यावत माहिती मिळायला मदत होते. ॲड. मधुकर रामटेके यांनी ' जमीन जुमला' हे पुस्तक सोप्या आणि साध्या मराठी भाषेत लिहिल्यामुळे सर्वसामान्यांना ते सहज समजेल. बरीचशी कायद्याची पुस्तके इंग्रजीत असल्यामुळे सोपा कायदा समजून घ्यायला मराठी भाषिकांची अडचण होते. मराठी भाषेत या पुस्तकाचे मूल्य निश्चितच गौरवास्पद आहे." तर उपस्थित पत्रकारांनी वरील मुद्द्यांबरोबरच पुस्तकातील सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम आदींची अद्यावत माहिती दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 



तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे, पत्रकार विलास भेगडे यांनी ॲड. रामटेके यांचे ' कायदेभान' हे युट्युब चॅनल म्हणजे माहितीचा खजाना असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप गाडेकर यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर