गुरू पौर्णिमेनिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरूंचा सन्मान

 पुणे दि. ११ (प्रतिनिधी) एम. सी. इ  सोसायटी,डॉ.पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या एच.जी. एम.आझम कॉलेज ऑफ एज्युकेश१२न , आझम कॅम्पस येथे  दिनांक 10 जुलै २०२५ रोजी गुरू पौर्णिमेनिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरूंचा सन्मान करण्याहेतू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी   महाविद्यालयाच्या अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. अनिता बेलापूरकर  यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना गुरू पौर्णिमेचे महत्व समजावून सांगत आजच्या काळात खरी गुरू पौर्णिमा म्हणजे भारतीय संस्कृती,नैतिक मूल्यांचा, परंपरेचा वारसा आपल्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या शिकवणुकीतून देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे हीच खऱ्या अर्थाने गुरूंसाठी गुरुदक्षिणा आहे असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून इ पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात चाळीस पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.नैतिक मूल्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व, गुरुंचे महत्व यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय कलात्मक, अर्थपूर्ण पोस्टर बनवले होते.तसेच सर्व अभ्यासक्रमांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे कार्य समन्वयक म्हणून प्रा.माधुरी यादव व सहाय्यक प्रा.मधू कुचेकर यांनी काम पाहिले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर