ऑटोनोमी महाविद्यालयांची जबाबदारी वाढली – माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ

 

पुणे दि.23 (प्रतिनिधी) – “नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) हे भारतीय शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवणारे ऐतिहासिक पाऊल आहे. Autonomy असलेल्या महाविद्यालयांची भूमिका या नव्या पर्वात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी केले.


ते खडकी येथील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय ऑटोनोमी झाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना  म्हणाले: “ऑटोनॉमी ही केवळ स्वायत्तता नव्हे, ती जबाबदारी आहे. अभ्यासक्रम रचना, मूल्यांकन, आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामध्ये स्वायत्त महाविद्यालयांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. NEP 2020 ही शिक्षणाच्या सर्जनशीलतेची संधी आहे.” त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नव्या शैक्षणिक संकल्पनांकडे असलेले उत्तरदायित्व, संशोधनातील नवे प्रवाह, डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित शिकवणीसंबंधी सखोल विवेचन केले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे  होते. ते म्हणाले, "स्वायत्त महाविद्यालयांनी NEP 2020 च्या अंमलबजावणीत नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. अशा मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते."



        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. सुचिता दळवी, महादेव रोकडे, राजेंद्र लेले उपस्थित होते. विभागांतील प्राध्यापकांनी आपले अनुभव मांडले आणि महाविद्यालयाच्या गुणात्मक उत्कर्षासाठी व अंमलबजावणीसाठी संकल्प करण्याचा निश्चय केला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा