श्रीराम विद्यालयात शालान्त परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

 

तळेगाव दाभाडे दि.१९ (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्रीराम विद्यालय, नवलाख उंबरे येथे उत्साहात पार पडला. या समारंभात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्रे व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले.



"विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील शिक्षण ही एक शस्त्र आहे – त्याचा योग्य वापर केल्यास कोणतेही यश अशक्य नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे आणि स्पर्धेच्या युगात स्वतःचे स्थान निर्माण करावे." असे यावेळी संस्थेचे कार्यवाह श्री . चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, 
संस्थेचे अध्यक्ष श्री . रामदास काकडे यांनीही प्रेरणादायी शब्दांत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.



मुख्याध्यापक विनय गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. युवराज सोनकांबळे यांनी सुत्रसंचालन केले तर संस्थेचे सदस्य  युवराज काकडे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
या समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद व आत्मविश्वास निर्माण झाला असून, शिक्षण क्षेत्रात श्रीराम विद्यालयाचे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले.



यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संभाजी मलघे, पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, शाळा समिती अध्यक्ष सुरेश शेटे, तसेच अनिल नरवडे, संतोष नरवडे, सोपान नरवडे, राजेंद्र कडलक, महेश शेटे, अरुण शेटे, सागर शेटे, शत्रुघ्न शेटे, दत्ता शेटे, प्रकाश शेटे, पांडुरंग कोयते, जालिंदर शेटे,  प्रभाकर पडवळ, नारायण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थ आणि पालकवर्ग यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर