कान्हे केंद्रातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा पैठणी साडी देऊन सन्मान

 


कान्हे दि. २३ (प्रतिनिधी) कान्हे केंद्रातील पाच विद्यार्थी   शिष्यवृत्ती परीक्षा यादीत आल्याने त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा केंद्रप्रमुख निर्मला काळे यांच्या संकल्पनेतून मानाची पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षा ही जीवनातील सर्वात पहिली आव्हानात्मक परीक्षा समजली जाते. ही परीक्षा स्पर्धा परीक्षेचा पाया मानली जाते. वर्षभर कठोर मेहनत, सरावातील सातत्य व चिकाटी यांच्या जोरावर या परीक्षेत यश मिळते. कान्हे केंद्रातील ऋषिकेश विरकर राज्यगुणवत्ता यादीत 11वा, श्लोक भारती नवोदय व जिल्हा गुणवत्ता यादीत तर रुद्र सावळे, रोशनी नवघरे, व साई निखळ  या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. 



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे, ब्राह्मणवाडी व जांभूळ या शाळेत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना अक्षता आंब्रुळे, अश्विनी पाटील व रेखा दाभोळकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कान्हे केंद्राच्या केंद्रप्रमुख निर्मला काळे यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा पार पडला.


यावेळी झालेल्या कार्यक्रमाला माजी शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्र प्रमुख श्रीमती सुनंदा दहितुले, विषय साधन व्यक्ती सुचेता भोई, रूपाली शेळके, आरती कुंडले, ज्योती लाव्हरे, सविता पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री .समीर सातकर ,सदस्य सचिन विरकर, श्री . सचिन आंब्रुळे, श्री.विजयकुमार चिले व सर्व शिक्षक वृंद इ. मान्यवर उपस्थित होते. गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व इतर शालोपयोगी साहित्य देण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच आनंददायी आहे, असे मत शोभा वहिले यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शालेय दप्तर केंद्रप्रमुख निर्मला काळे यांनी तर इतर शालेय उपयोगी लेखन साहित्य श्रीम् शोभा वहिले, सुचेता भोई, रूपाली शेळके व आरती कुंडले यांनी दिले.
शाळेतील इतर सहकारी, पालक, ग्रामस्थ, अधिकारी व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया मार्गदर्शक शिक्षिका अक्षता आंब्रूळे, अश्विनी पाटील, रेखा दाभोळकर यांनी दिली. 



कान्हे केंद्रातील शिक्षिका शमा शेख, श्वेता भारती व छाया शेंडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन  केंद्र कान्हे सर्व शिक्षक वृंद यांनी केले तर सूत्रसंचालन श्री जिजाराम काळडोके सर व आभार श्री मारुती लायगुडे सर यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा