कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इतिहासाला उजाळा देत 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा

 

तळेगाव दाभाडे दि. 15 (प्रतिनिधी) तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज 79 वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला गेला. मागील दोन दिवसांपासून सो असलेल्या हर घर तिरंगा या उपक्रमात आजही हाच ध्वजारोहणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. 



या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष मा.श्री. श्री मेंथे, लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र झोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते तसेच संस्थेचे संस्थापक माननीय श्री. चंद्रकांतजी काकडे, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री संदीपजी काकडे, मा. उद्योजिका सौ. राजश्रीताई म्हस्के, संचालिका सौ. गौरी काकडे , तसेच इतर सर्व संचालक सभासद श्री. सुभाष दाभाडे, सौ. मंगलताई काकडे, सौ.सोनल काकडे, सौ. सुप्रिया काकडे, पालक वर्ग,  शाळेच्या मुख्याध्यापिका मिस टी. एन.  साईलक्ष्मी,  शाळेच्या  उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत, पर्यवेक्षिका सौ . निता मगर व सौ.सोनाली कदम,  सर्व शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


 कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व शाळा अतिशय सुंदररित्या सजवली होती. आलेल्या मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांतजी काकडे व संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीपजी काकडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ ,शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मुख्य मान्यवर व संचालक मंडळांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  मान्यवरांची ओळख करून दिल्यानंतर विद्यार्थी भाषणात कु. समृद्धी अनुभुले इ.( चौथी), 
कु. प्रज्वल गायकवाड (इयत्ता सातवी) व कु. तनुजा मराठे (इयत्ता आठवी )यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्याचा इतिहास उलगडला, तसेच आजच्या भारताची प्रगती देखील सांगितली. 

यानंतर शाळेच्या शिक्षका सौ. प्रतिमा चौधरी यांनीही आपल्या मनोगतातून राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर परिश्रम करावेत व आपल्या गावाचे, शाळेचे नाव उज्वल करावे असे सांगितले. शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व तुम्ही सर्वजण भारताचे उद्याचे सुजाण नागरिक आहात यासाठी सतत प्रयत्नशील राहा असा संदेशही दिला. 

शाळेच्या मुख्याध्यापिका मिस टी. एन साईलक्ष्मी यांनीही स्वतंत्र भारताचा धगधगता इतिहास सर्वांच्या डोळ्यांसमोर आणला. यानंतर आलेले प्रमुख पाहुणे मा. श्री. मेंथे सर यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपणही भविष्यातील भारताचे सुजाण नागरिक होऊन विविध क्षेत्रात आपल्या प्रगतीचा ठसा उमटवावा असे सांगितले. यानंतर मा. श्री. राजेंद्रजी झोरे यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले व या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास तसेच शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर सर्व पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला. 



सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. दहावीच्या विद्यार्थ्यांनी कु. साईशा कळसकर व कु. अनिता सुतार यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा