एच.जी.एम. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची (इंडक्शन सप्ताह) जोरदार सुरुवात
पुणे दि. 12 (प्रतिनिधी) एम.सी.इ. सोसायटी डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठाचे एच.जी.एम. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन, यांच्या वतीने 11ऑगस्ट 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष (इंडक्शन सप्ताह) उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
इंडक्शन सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमाची सुरुवात अधिष्ठाता व प्राचार्या डॉ. अनिता बेलापूरकर, यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी पालकांचे तसेच बी.एड., एम.एड., बी.ए.बी.एड. व बी.एस्सी. बी.एड. च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. व महाविद्यालयाच्या उल्लेखनीय वाटचालीची माहिती देत, पालकांना त्यांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्याची शाश्वती दिली.
उदघाटन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे इंडक्शन सप्ताहातील विद्यार्थ्यांचे मनोगत. यामध्ये बी.एड., एम.एड., बी.ए. बी. एड. व बी.एस्सी. बी.एड. या अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाच्या विध्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. विदयार्थ्यांनी सांगितले की, ‘ एच.जी. एम आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन हे त्यांना एक कुटुंबासारखेच वाटते. आझम कॅम्पसमध्ये समानता आणि बंधुत्वाचे पालन केले जाते.येथिल शिक्षक काळजी घेणारे आणि त्यांचे अध्यापन कौशल्ये निपुण व उच्च शिक्षित आहेत. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशनचे शैक्षणिक क्षेत्रातील भविष्य उज्ज्वल आहे.
सर्व कोर्सेस च्या वर्ग शिक्षकांनी कोर्सचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यंद्याच्या जी. एम. सी. प्रमुख प्रा. माधुरी यादव यांनी जिमखाना व्यवस्थापन परिषदेबद्दल ची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
.
Comments
Post a Comment