पवना शिक्षण संकुल पवनानगर मध्ये तिन्ही दिवशी माजी विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचा मान, माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गरीब गरजूं विद्यार्यथ्यांना गणेवश वाटप

 

पवनानगर ता.१६ (प्रतिनिधी) - पवनानगर परिसरात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला पवना शिक्षण संकुल पवनानगर मध्ये तिन्ही दिवशी माजी विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचा मान, माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गरीब गरजूं विद्यार्यथ्यांना गणेवश वाटप करण्यात आले.



शासकीय परिपत्रकानुसार यावर्षीदेखील १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान परिसरातील शाळा, महाविद्यालये,शासकीय निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये, ऐतिहासिक किल्ले याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
येथील पवना शिक्षण संकुल पवनानगरचे पहिल्या दिवशीचे ( ता.१३) ध्वजारोहण शाळचे माजी विद्यार्थी व टियुव्ही कंपनीचे एच.आर मॅनेजर अमोल कालेकर यांच्या हस्ते तर पूजन जेष्ठ सदस्य प्रल्हाद कालेकर करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी (ता.१४) रोजी ध्वजारोहण शाळेची माजी विद्यार्थीनी सौ.वर्षा रामदास पाठारे हिच्या हस्ते व उद्योजक बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते तर पूजन शालेय समितीचे सदस्य नारायण कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी  ध्वजाचे पूजन उद्योजक अतुल लक्ष्मण कालेकर यांच्या हस्ते तर ध्वजारोहण व्हेंकिज इंडीया लिमिटेड कंपनीचे मॅनेजर व  शाळेचे माजी विद्यार्थी विलास वाघमारे व अतुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.



यावेळी काले गावचे युवा उद्योजक अतुल लक्ष्मण कालेकर यांच्या वतीने पवना शिक्षण संकुलातील ७० विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी पवना शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर माजी उपसरपंच अमित कुंभार, छायाताई कालेकर, फुलाबई कालेकर, पोलिस पाटील सिमा यादव,प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका शितल शेटे, ग्रामसेवक शशिकिरण जाधव, माजी उपसरपंच अनिल भालेराव, नितीन बुटाला, सचिन मोहिते, किशोर शिर्के, संदिप बुटाला शुभम कालेकर, हनुमंत राऊत, सुनिल बुटाला,अलताफ शेख,आकाश कडू ,निलेश मोहोळ,सुनिल मोरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की,ज्या शाळेत आम्ही शिकलो लहानाचे मोठे झाले आणि आज एका नामांकित कंपनीत मॅनेजर काम करतो त्या शाळेत मला ध्वजारोहणाचा मान मिळाला आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो.




यावेळी बोलताना अतुल कालेकर म्हणाले की,ज्या शाळेने आम्हाला मोठं केलं त्या शाळेत गरीब गरजू व ज्यांना आई किंवा वडील नाही अशा विद्यार्थ्यांना मदत करुन त्यांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे पुढील काळातही शैक्षणिक मदतीसाठी तत्पर राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत काळे सुत्रसंचलन राजकुमार वरघडे, वैशाली कोयते तर आभार गणेश ठोंबरे यांनी मानले.
  

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा