सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन तर्फे गणेश काकडे व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन च्या वतीने भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

 


तळेगाव दाभाडे दि.28 (प्रतिनिधी) सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन तर्फे गणेश काकडे व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन च्या वतीने भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील माता भगिनींकरिता आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे यांनी गणेश काकडे हे नेहमी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात. त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे परिसरातील महिला दरवर्षी अतिशय उत्साहाने आपल्या घरी येणाऱ्या गौरायांची आरास करीत असतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. 



स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. तसेच या स्पर्धेत भरघोस बक्षिसांची लयलूट होणार आहे. बक्षीस वितरणास उपस्थित महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ विशेष प्राविण्य महापैठणी प्रथम क्रमांक मानाची पैठणी, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ, तृतीय क्रमांक चांदीचा छल्ला व उत्तेजनार्थ तीन बक्षीसे सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तू दिले जाणार आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे 
१.ही स्पर्धा तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील महिलांसाठी असणार आहे.
२.स्पर्धेची तारीख ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर राहील
३.पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून सजावट करणे.
४.महिलांनी स्वतः बनविलेल्या आणि सर्जनशीलता (Creativity) असलेल्या स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल.
५.स्पर्धकांनी या 9762133324 व्हाट्सअप क्रमांकावर गौरी सजावटीचा व्हिडिओ व याच व्हिडिओत स्पर्धकाने स्वतःची माहिती, सजावटीची संकल्पना (theme)पाठवावी.
६.व्हिडिओ काढताना आडवा मोबाईल धरावा. सोबत गौरी सजावटीचा एक फोटोही पाठवावा.
७.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील 
८.अधिक माहितीसाठी 7038784875  या क्रमांकावर संपर्क साधावा. 


स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक 05 सप्टेंबर रोजी श्रीरंग कलानिकेतन, वनश्री नगर, इंद्रायणी कॉलेज जवळ, तळेगाव स्टेशन येथे सकाळी 10 वाजता संपन्न होईल कार्यक्रमाचे संयोजक व मुख्य अतिथीश्री गणेश मोहनराव काकडे हे असणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन चेविलास भेगडे संस्थापक, रेश्मा फडतरे अध्यक्ष,अमीन खान संस्थापक अध्यक्ष,रमेश जाधव गुरुजी उपाध्यक्ष,केदार शिरसट सचिव, जगन्नाथ काळे कार्याध्यक्ष,अंकुश दाभाडे खजिनदार,रेखा भेगडे पत्रकार परिषद प्रमुख यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. तरी तळेगाव दाभाडे परिसरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गणेश मोहनराव काकडे यांनी केले आहे.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा