गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी वैज्ञानिक लिखाण महत्त्वाचे - डॉ. संभाजी मलघे


तळेगाव दाभाडे दि. २३ (प्रतिनिधी) :- वैज्ञानिक लिखाणाची योग्य जडणघडण ही गुणवत्ता पूर्ण संशोधनाची पहिली पायरी असून वैज्ञानिक लेखन हे केवळ संशोधनाचे परिणाम नोंदविण्याचे साधन नसून वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभाग व माय रेंज पब्लिकेशन सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक लेखन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मलघे बोलत होते. याप्रसंगी विविध विषयांचे विभाग प्रमुख, विज्ञान विभाग प्रमुख डॉ.रोहित नागलगाव , सर्व विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे व अध्यक्ष रामदास काकडे यांनी शुभेच्छा व प्रेरणा दिली.



पुढे बोलताना डॉ. मलघे म्हणाले की, मानवी जगण्याला शास्त्रीय आधार प्राप्त करून देणाऱ्या विज्ञान शाखेचा विस्तार हा व्यापक स्वरूपाचा आहे. बदलत्या शैक्षणिक आणि जागतिक संदर्भांमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. संशोधकीय पातळीवर विविध विषयांना वाव असून विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती अंगी बांधली पाहिजे असे मत डॉ.मलघे यांनी व्यक्त केले.  तसेच इंद्रायणी महाविद्यालयामध्ये बीएससी कॉम्प्युटर सायन्स विभाग या वर्षापासून सुरू करून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.



याप्रसंगी मायरेज पब्लिकेशन सेंटरचे राजेश ढाकणे व प्रकल्प प्रमुख प्राजक्ता मोहिते यांनी विद्यार्थ्यांना संशोधन पर लिखाणाचे विविध प्रकार, संशोधनाची मांडणी, संदर्भ ग्रंथ, वैज्ञानिक भाषा आणि शैली, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकाशनाच्या विविध संधी, त्यासाठी वापरली जाणारी समाज माध्यमे, सॉफ्टवेअर याबाबत सखोल माहिती दिली.



याप्रसंगी कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. राखी चौडणकर यांनी कार्यशाळा आयोजित करणे मागील हेतू तसेच वैज्ञानिक लेखनाचे मूलभूत तत्वे, संशोधन प्रबंध लेखनातील तांत्रिक बाबी अशा अनेक गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विद्या पाईकराव यांनी केले तर आभार डॉ. मनिषा जाधव यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा