इंद्रायणी महाविद्यालयात ‘अर्थम वर्धिनी’ इकॉनॉमिक्स क्लबचे उद्घाटन

 


तळेगाव दाभाडे, दि. २१ (प्रतिनिधी) इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथील अर्थशास्त्र विभागामार्फत “21 व्या शतकातील भारतापुढील आव्हाने” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रो. डॉ. श्रुती तांबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.



या कार्यक्रमादरम्यान अर्थशास्त्र विभागाचा “अर्थम वर्धिनी” हा इकॉनॉमिक्स क्लब स्थापन करण्यात आला. उद्घाटन प्रमुख पाहुण्या डॉ. तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी या क्लबच्या निमित्ताने तयार केलेली विविध अर्थशास्त्रीय मॉडेल्स आणि पोस्टर्स प्रदर्शनासाठी मांडण्यात आली होती. डॉ. तांबे यांनी सर्व मॉडेल्स व पोस्टर्सची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
व्याख्यान सत्रात बोलताना डॉ. तांबे म्हणाल्या,
“भारतीय युवा पिढीकडे प्रचंड क्षमता आहे. मात्र ती योग्य दिशेने वळवण्यासाठी क्षमता, कौशल्य, दूरदृष्टी, योजना आणि अंमलबजावणी या पंचसूत्री अंगीकारणं अत्यावश्यक आहे. 21 व्या शतकात भारतासमोर असणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी ही पंचसूत्रीच तरुणाईला मार्गदर्शक ठरेल.”



महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की,
“अर्थशास्त्र ही केवळ शैक्षणिक गोष्ट नाही, तर समाजाच्या घडामोडींना दिशा देणारे प्रभावी साधन आहे. ‘अर्थम वर्धिनी’ क्लब विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, संशोधनाची गोडी आणि सामाजिक भान विकसित करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल.”



विभागप्रमुख डॉ. सदाशिव मेंगाळ यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले,
“हा क्लब म्हणजे विद्यार्थ्यांसाठी चिंतन, चर्चा आणि कृती यांचं केंद्र आहे. इथे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, विश्लेषणशक्ती आणि आत्मविश्वास विकसित करण्याची संधी मिळेल.”



या कार्यक्रमाचे समन्वयक अर्थशास्त्र विभागातील प्रा. प्रणिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर विभागातील डॉ. सत्यम सानप, डॉ. अर्चना जाधव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे उद्घाटन सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay





Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा