एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनी "हृदय उपचार केंद्र" चे उदघाटन


तळेगाव दाभाडे दि.२२ (प्रतिनिधी ) माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय व रुबी एलकेअर यांचे सहकार्याने नवीन  "हृदय उपचार केंद्र" सुरु करण्यात आले आहे. संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनी या  केंद्राचे उदघाटन मावळचे विद्यमान आमदार मा. श्री. सुनील अण्णा शेळके यांचे हस्ते दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ  डॉ. राजेश धोपेश्वरकर उपस्थित होते. 



मावळ भागातील गरजू रुग्णांना या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा हृदय उपचार केंद्रामध्ये अत्यंत माफक दरामध्ये रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, वाल्व्ह रिप्लेसमेंट इत्यादी हृदय रोगांवर उपचार करण्यात येणार आहेत.  मावळ भागातील जनतेला देत असलेल्या उत्तम आरोग्य सेवेबाबत तसेच मावळ भागामध्ये आरोग्यविषयक विविध उपक्रमांमध्ये संस्था त्यांना करत असलेल्या सहकार्याबद्दल आमदार मा. श्री. सुनील अण्णा शेळके यांनी संस्थेच्या कार्यकारी संचालिका  डॉ. सुचित्रा नागरे यांचे  आभार मानले व संस्थेचे कौतुक केले. तसेच त्यांनी आरोग्य सेवेबाबत त्यांचे विचार मांडले व संस्थेला आरोग्यसेवेबाबत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 



मावळमधील लोकांसाठी हृदयरोग उपचार  केंद्र सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त  केला तसेच  मायमरच्या सहकार्याने मावळमधील लोकांसाठी सर्वोत्तम हृदयरोग आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी कार्य करतील अशी भावना व्यक्त केली.  मायमर सारखी वैद्यकीय संस्था, स्थानिक नेते आणि रुबी एलकेअर सारखी संघटना ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा पुरवण्याबाबत चांगले कार्य केल्यास त्याचा रुग्णांना निश्चितच फायदा होईल असे मत विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश धोपेश्वरकर यांनी व्यक्त केले.



हृदयरोग केंद्र सुरू करण्याचे डॉ. विश्वनाथ कराड सर आणि डॉ. सुरेश घैसास सर यांचे स्वप्न आज एमआयएमईआरच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त  पूर्ण झाले अशी भावना  डॉ. सुचित्रा नागरे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केली.
डॉ. दर्पण महेशगौरी, वैद्यकीय अधीक्षक यांनी स्वागतपर भाषणामध्ये संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. संस्थेमध्ये मावळ भागातील रुग्णांना देण्यात येत असलेल्या विविध आरोग्य सेवा, ग्रामीण भागात आयोजित करण्यात येत असेलेली विविध आरोग्य शिबिरे तसेच  विविध शासकीय योजनांची माहितीही त्यांनी यावेळी  दिली.



या कार्यक्रमास संस्थेच्या प्राचार्य डॉ. दीपा नायर, भौतिकोपचार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्नेहल घोडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पूर्वा  मांजरेकर, रुबी एलकेअरचे पदाधिकारी  तसेच संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. तुषार खाचणे  यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. वैशाली कोरडे यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा