दिव्यांग मुलांसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे विशेष आयोजन

तळेगाव स्टेशन  दि. 7 (प्रतिनिधी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच व रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील कामयानी संस्थेच्या सिंधुताई जोशी उद्योग केंद्रामध्ये दिव्यांग मुलांसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले,या उपक्रमाची माहिती देताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ.स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी असे सांगितले की, गेली एक तपाहून अधिककाळ  हा उपक्रम राबवित आहे.समाजातील अत्यंत संवेदनशील असणार्या दिव्यांग मुलांशी संवाद साधून त्यांच्या अंतर्मनातील भावनांचे प्रकटीकरण होण्यासाठी अशाप्रकारच्या सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमाची नितांत गरज असते. सौ.बाळसराफ यांनी तरूण पिढीने हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की, परमेश्वराने आपल्याला उत्तम शरीरसंपदा दिलेली आहे.दुदैवाने त्यांना असे भाग्य प्राप्त झाले नाही त्या दिव्यांग मुलांसाठी सहकार्याचा हात पुढे करणे हीच खरी समाजसेवा व मानवधर्म आहे, त्यामुळे समाजातील दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती पेक्षा त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्याशी सहकार्याची भावना वृध्दिंगत करा असे आवाहन केले.



      रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींनी  मी दिव्यांग मुलांना राख्या बांधल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.शाळेतील शिक्षिका सौ.रुचिरा बासरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ.स्नेहल बाळसराफ यांनी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य व कौतुकास्पद आहे असे सांगून शाळेचा सहभाग निश्चित असेल असे अभिवचन दिले.



कामयानी संस्थेचे व्यवस्थापक श्री.दीपक सोनवणे यांनी दिव्यांग मुलांसाठी सौ.बाळसराफ यांचेकडून वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आनंदाचे क्षण निर्माण करतात, त्याबद्दल त्यांनीं ऋण व्यक्त केले व रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थीनींचे कौतुक केले व त्यांना भेटवस्तू दिल्या.संस्थेचे प्रशासकीय प्रमुख श्री.प्रसाद करमरकर यांनी संस्थेची माहिती सांगून श्री.शिवराज गराडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.



        सदर उपक्रम यशस्वीपणे राबविल्या बद्दल बालमोहन संस्थेचे विश्वस्त श्री.नंदन रेगे व शाळेचे मुख्याध्यापक श्री.दीपक फोंडके यांनी सौ.बाळसराफ यांचे अभिनंदन केले.समाजातील विविध स्तरातून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कोतूकाचा वर्षाव होत आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर