श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या तळेगाव दाभाडे येथील मुख्य कार्यालयात, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे यांच्या हस्ते ध्वजवंदन


तळेगाव दाभाडे दि.१६ (प्रतिनिधी) देशप्रेमाने प्रेरित झालेल्या अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांची जुलमी सत्ता उलथून टाकली. अनेकांनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण करा. आपला भारत देश बलशाली राष्ट्र बनविणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. स्वराज्याचे सुराज्य बनविण्यासाठी युवा पिढीचे योगदान मोठे राहणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे यांनी केले.
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या तळेगाव दाभाडे येथील मुख्य कार्यालयात,
 पुणे पीपल्स को-ऑपरेटिव बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते.



 यावेळी पतसंस्थेचे आधारस्तंभ तथा पुणे   जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे  सचिव संतोष भेगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, 
सल्लागार बबनराव भोंगाडे,  विलास भेगडे,संजय ओसवाल, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन अंकुश आंबेकर, वडगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे,
पतसंस्थेचे सचिव अतुल राऊत, उपाध्यक्ष समीर भेगडे ,खजिनदार अमित भसे ,सरव्यवस्थापक अनिल भोमे, व्यवस्थापिका तस्लिमा सिकिलकर, सतर्क महाराष्ट्राच्या संपादिका रेखा भेगडे यांच्यासह आजी- माजी पदाधिकारी, सभासद, निमंत्रित संचालक, कर्ज व अर्थ नियोजन समिती, सल्लागार समिती, कर्मचारी वर्ग व दैनंदिन बचत प्रतिनिधी उपस्थित होते.


दरम्यान, पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभापती बबनराव भोंगाडे सभागृहात पतसंस्थेच्या संचालकांची आढावा मीटिंग झाली. मार्गदर्शन करताना बबनराव भेगडे म्हणाले, सहकारातूनच समृद्ध राष्ट्र घडते. पारदर्शकता हा सहकाराचा गाभा आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांची पत वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.


संतोष भेगडे म्हणाले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांचे हित केंद्रस्थानी मानून पतसंस्थेची
वाटचाल चालू आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभार यामुळे पतसंस्थेचा ऑडिट वर्ग 'अ ' हा दर्जा कायम टिकून आहे. सुमारे चार कोटी रुपये खर्च करून पतसंस्थेच्या
मालकीचे सुसज्ज आणि अद्ययावत मुख्य कार्यालय उभे करण्यात आले आहे.
 शरद भोंगाडे यांनी पतसंस्था राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह संचालक राकेश खळदे, प्रविण
मुऱ्हे, विजय भेगडे, संध्या देसाई उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले. अंकुश आंबेकर यांनी आभार मानले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा