HDFC परिवर्तन व अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन याच्यासयुक्त विद्यमानाने म्हाळसकांत विद्यालयामध्ये विज्ञान केंद्राचे उद्घाटन

 

पुणे, दि. २२ (प्रतिनिधी) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री म्हाळसकांत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आकुर्डी येथे, विज्ञान केंद्र व इंटिग्रेटेड मोबाईल लॅबचे उदघाटन झाले. हे विज्ञान केंद्र एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या आर्थिक सहाय्याने व अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या वतीने स्थापन करण्यात आले आहे. 


विज्ञान केंद्राबरोबरच इंटिग्रेटेड सायन्स लॅब व मोबाईल इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन , आयुक्त डिपार्टमेंट ऑफ सोशिअल जस्टीस अँड इंपॉवरमेन्ट च्या श्रीमती दिपा मुधोळ-मुंडें , तसेच मा. अमोल बिटकर झोनल हेड HDFC बँक व  कुलदीप छाजेड झोनल हेड HDFC बँक पुणे , पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रशासन श्री ए.एम जाधव  यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतिश राव (शास्त्रज्ञ व अभियंता,इस्रो ) ,तसेच सीएसआर एचडीएफसी बँक परिवर्तनचे वरिष्ठ व्यवस्थापक योगेश पगारे, अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशन जनरल मॅनेजर विक्रांत सोळंकी, राज्य प्रमुख रमेश हितनल्ली, , श्री म्हाळसकांत प्राचार्य श्री . मालुसरे बी .डी. सर, उपप्राचार्य श्रीमती पठारे मॅडम ,तसेच प्रकल्प विभाग प्रमुख  सुधीर सावंत आदी उपस्थित होते.


  आयुक्त डिपार्टमेंट ऑफ सोशिअल जस्टीस अँड इंपॉवरमेन्ट च्या श्रीमती दिपा मुधोळ-मुंडें यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा तयार होईल. विज्ञानामधील भविष्यात संधी कशा मिळवाव्यात, याबाबत मार्गदर्शन केले तसेच मुलांनी वेळेचा सदपयोग  आणि ज्ञान हे मुलांना पुढील स्पर्धेत टिकण्यासाठी महत्वाचे आहे असे मार्गदर्शन केले  . त्याचबरोबर श्री मालुसरे सर यांनी मुलांना या संस्थेमार्फत काय फायदे होतील आणि एकत्र काम करून  शाळा कशा समृद्ध होतील, याबाबत मार्गदर्शन केले. 



या विज्ञान प्रदर्शनात दिवस-रात्र, ऋतू, मानवी शरीर, डिझाईन थिंकिंग हे सर्व प्रयोग उपस्थित मान्यवरांनी समजून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंती विद्या कदम  आणि आभार रमेश हितनल्ली यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा