पुणे शहर टीडीएफ व माध्य. शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमी दिले जाणारे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर: रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी होणार वितरण

 


पुणे दि. २६ (प्रतिनिधी) दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. पुणे शहरामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा या सन्मान सोहळ्यामध्ये गौरव केला जातो. 



यावर्षी हा गुणगौरव सन्मान सोहळा येत्या रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले सभागृह, टिंबर मार्केट, भवानी पेठ, पुणे येथे संपन्न होत आहे. या सन्मान सोहळ्यामध्ये विशेष गुणगौरव (शासकीय अधिकारी) - 3, राज्य पुरस्कार विजेते-2, मुख्याध्यापक-7 , ज्युनि.कॉलेज प्रा.-8 , शिक्षक/ शिक्षिका-32, दिव्यांग शाळा-1, शिक्षकेतर कर्मचारी-3 अशा 56 मान्यवर व शिक्षक बंधू भगिनींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती पुणे शहराध्यक्ष प्रा. संतोष थोरात यांनी दिली आहे.


 कार्यक्रमास श्री.गणेश सोनुने, उपायुक्त पुणे मनपा, श्री, प्रशांत जगताप, माजी महापौर पुणे व शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, श्री.जी.के. थोरात राज्य टीडीएफ अध्यक्ष, श्री. के. एस डोमसे, सचिव राज्य टीडीएफ, प्रा. यशराज पारखी, लेखक व शिक्षण तज्ञ, श्री. शिवाजीराव कामथे, विभाग अध्यक्ष, प्रा.सचिन दुर्गाडे विभागीय सचिव हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा