आझम कॅम्पस मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

 

पुणे दि.११ (प्रतिनिधी) महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आझम कॅम्पस येथे १० सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन  आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी एम.एम.इ.अँड आर सी. च्या अध्यक्षा आणि एम. सी. इ  सोसायटी च्या उपाध्यक्षा श्रीमती आबेदा इनामदार, एम. सी. इ  सोसायटी चे सचिव प्रा. इरफान शेख , एम.एम.इ.ऍण्ड आर सी. चे उपाध्यक्ष डॉ.आरिफ अली मोहम्मद मेमन तसेच सचिव डॉ. नझीम रफी शेख, डॉ.एन.वाय.काझी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बबन जोगदंड, विभाग प्रमुख बार्टी व संशोधन अधिकारी यशदा पुणे हे लाभले होते.

डॉ. बबन जोगदंड शिक्षकांशी संवाद साधताना म्हणाले की शिक्षणामुळेच सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो, विद‌यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते त्यामुळे त्यांना शिक्षकांनी संवाद कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर, सृजनशीलता, आत्मविश्वास, कष्ट व मेहनत करण्याची तयारी या पाच गोष्टी  विद्यार्थ्यांना दयायला हव्यात जेणेकरून उत्तम विद्यार्थी घडू शकेल. 



तसेच आपल्या अध्यक्षीय  भाषणात  श्रीमती आबेदा इनामदार  म्हणाल्या की शिक्षकांवर मुलांना घडविण्याची खूप मोठी जबाबद‌ारी असते, ती निभावताना काही मुख्य तत्वांचा शिक्षकांनी विचार करावा ती मुख्य तत्वे म्हणजे विद्‌यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, विद्यार्थ्यांमधील दडलेली हुशारी-चातुर्य शोधून काढणे, आणि शास्त्रीय दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये यावा यासाठी शिक्षकांनी  प्रयत्न करायला हवेत.


या कार्यक्रम प्रसंगी एम.सी.इ. सोसायटीच्या सर्व महाविद्यालयांचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे सहाशेहून अधिक कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरील  विशेष कामगिरीबद्दल विविध विभागातील प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. तसेच आझम कॅम्पस मधील निवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना कृतज्ञता पूर्वक गौरविण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन  अधिष्ठाता व प्राचार्या डॉ.अनिता बेलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एच.जी. एम.आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन चा संपूर्ण स्टाफ यांनी पाहिले.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay






Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा