विद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरदार होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे!.. उद्योजक रामदास काकडे रोटरी सिटी आयोजित मावळ तालुका स्तरीय टिचर्स ट्रेनिंग सेमिन



तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सभागृहात नुकताच रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व मावळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुका स्तरीय इयत्ता ५ वी इयत्ता ८ वी परीक्षार्थींना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी "शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा" (Teachers Training Program)संपन्न झाली असून कार्यशाळेचे उदघाटन डिस्ट्रिक्ट बेसिक एज्युकेशन व लिट्रसी डायरेक्टर वसंतराव माळुंजकर यांच्या शुभहस्ते झाले असून पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विराज खराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

स्पर्धेच्या व औद्योगिक युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षण द्यावे व विद्यार्थ्यांमधून उद्योजक, क्लासवन अधिकारी  निर्माण व्हावेत याकडे लक्ष द्यावे, विद्यार्थ्यांनी नोकरदार न होता भविष्यात नोकऱ्या देणारे व्हावेत असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष उद्योगपती रामदास काकडे यांनी करताना आजच्या काळात देशाची अर्थव्यवस्था बलदंड करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे देशाची निर्यात वाढली तर देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल यासाठी शिक्षकांनी जुन्या व नवीन अध्यापन पद्धतीचा वापर करून उद्याची पिढी सक्षम करावी हे सांगताना रामदास काकडे यांनी रोटरी सिटी व मुख्याध्यापक संघाच्या कामकाजाचे कौतुक केले.
विद्यार्थी सक्षमीकरण योजनांची माहिती देताना शिक्षकांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात करावे होणाऱ्या विविध प्रशिक्षणांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी विराज खराटे यांनी करताना शासनाच्या विविध गुणवत्ता वाढ योजनांची माहिती विशद केली. 



तर मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी रोटरी सिटीच्या माध्यमातून आपण शैक्षणिक प्रोजेक्ट घेणार असल्याचे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना रोटरीच्या विविधांगी उपक्रमांची माहिती विशद केली. रोटरीच्या बदलत्या धोरणानुसार विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती विशद करताना प्रत्येक क्लबने समाजोपयोगी उपक्रम घेताना रोटरी फाउंडेशनला देखील मदत करावी म्हणजे भविष्यात ग्लोबल ग्रँडमधून मोठे प्रोजेक्ट समाज हितासाठी राबवता येतील असे प्रतिपादन वसंतराव माळुंजकर यांनी करताना डिस्ट्रिक्टच्या विविध योजनांची माहिती दिली.



ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, मुख्याध्यापक संघाचे राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे यांनी मनोगताद्वारे उपक्रमाविषयी भावना व्यक्त केल्या. रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, प्राचार्य संभाजी मलघे,सहप्रांतपाल भालचंद्र लेले, सेक्रेटरी संजय मेहता,दिलीप पारेख,सुरेश शेंडे, डिस्ट्रिक्ट को. डायरेक्टर संदीप मगर, सहयोग फाउंडेशनचे संदीप पानसरे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, सेक्रेटरी विकास तारे इ. मान्यवरांचे उपक्रमास विशेष उपस्थिती होती.



दिवसभर चाललेल्या कार्यशाळेत शिष्यवृत्ती अध्यापनातील नव्या पद्धती, विद्यार्थ्यांची तयारी,प्रश्नपत्रिकेचा अभ्यास, निकाल सुधारण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन असे विविध मुद्दे हाताळण्यात आले. शिक्षकांना थेट संवाद, शंका निरसन व प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळाले. कल्याणी कडेकर,अश्विनी पाटील,मंगल आहेर, बोरसे मॅडम, उमेश इंगूळकर यांनी मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहिले. उपक्रमाच्या समन्वयक दिपाली पाटील यांनी मनोगताद्वारे सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख मुकुंद तनपुरे यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश बारणे यांनी केले लिट्रशी डायरेक्टर दशरथ ढमढेरे यांनी आभार मानले. अध्यक्ष भगवान शिंदे व सह प्रकल्प प्रमुख ॲड. रामदास काजळे व रोटरी मेंबर्सच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार झाले.


यावेळी संग्राम जगताप,निलेश राक्षे, आनंदराव रिकामे,स्वाती मुठे,मनिषा पारखे, वैशाली लगाडे, वर्षा खारगे, कमल ढमढेरे,दिनेश निळकंठ,संजय भागवत, मोहन खांबेटे, रघुनाथ कश्यप, विश्वास कदम इ.सह रोटरी सिटी चे पदाधिकारी व मेंबर्स मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व मेंबर्स यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा