
मुंबई, दि.15 (प्रतिनिधी)
मावळ तालुक्यातील उद्योजक व काँग्रेसचे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रामदासआप्पा काकडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी,पशुसंवर्धन सभापती राष्ट्रवादीचे बाबुरावआप्पा वायकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादीचे सुभाष जाधव, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, रविंद्र भेगडे ,माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली देश आणि राज्याच्या प्रगतीचा नवा अध्याय रचला जातोय. भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून आज या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.भाजपावर या सर्वांनी ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी दिली. भाजपाची विचारधारा ही व्यक्तिनिष्ठ नसून पक्षाच्या विचारधारेसोबत प्रत्येक कार्यकर्ता काम करतो आणि ही विचारधाराच आपल्याला विजयाकडे घेऊन जाते. जे प्रश्न घेऊन याल ते सोडवले जातील तसेच पक्ष तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे त्यांनी नमूद केले. सर्व ताकद लावून ही विचारधारा तळागाळात पोहोचवायची आहे असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केले. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले की, या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यामंध्ये पुण्यातील माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य सचिनभाऊ घोटकुले, माजी जिल्हा उपाध्यक्ष संतोषशेठ मुऱ्हे, वडगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य अरुण चव्हाण, जिल्हा परिषदे माजी समाजकल्याण सभापती अतिशराव परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव असवले, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, खरेदी विक्री संघसंचालक बाजीराव वाजे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अरुण माने आदींचा समावेश आहे.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/
Comments
Post a Comment