तरुणांनी व्यसनांपासून अलिप्त रहावे- श्री विक्रम देशमुख, तहसीलदार मावळ

 


वडगाव मावळ दि. 16 (प्रतिनिधी) तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे मोबाईलचा अतिवापर टाळावा समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नये असे प्रतिपादन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले.



     वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य बीए महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा कोणत्याही क्षेत्रातील आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे श्री देशमुख म्हणाले.



 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक बाफना हे होते डिजिटल साधनांचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करावा या साधनांमध्ये जगातील अनेक प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळते असे अध्यक्ष भाषणात श्री बाफना म्हणाले.



            याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे,  संचालक प्रल्हाद जांभुळकर, राजेश बाफना, चंद्रकांत ढोरे हे उपस्थित होते प्राचार्य अशोक गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रा. महादेव वाघमारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला डॉ. शितल दुर्गाडे यांनी आभार मानले प्राध्यापक रोहिणी चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले प्रा . डॉ . शितल शिंदे, डॉ. जया धावरे,  योगेश जाधव, प्रियांका पाटील, प्रणिता सूर्यवंशी, अनिल कोद्रे, प्रा. केंगले, प्रा ठाकरे प्रा.ओव्हाळ उपस्थित होते.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/





Comments

Popular posts from this blog

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा

विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार - डॉ. व्ही. बी.गायकवाड