तळेगाव दाभाडे येथे निर्माल्य संकलन उपक्रमामध्ये नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

 

तळेगाव दाभाडे दिनांक 17 (प्रतिनिधी) गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थ्यांनी निर्माल्य संकलन व जनजागृती उपक्रम राबवला. या उपक्रमाचे आयोजन तळेगाव दाभाडे नगर परिषद व ग्रीन क्लब (युनिसेफ व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने स्थापन) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या उपक्रमाचे समन्वयन प्रा. विजय दराडे आणि डॉ. दिग्विजय पाटील यानी केले.


विसर्जन घाटावर विद्यार्थ्यांनी भक्तांकडून हार, फुलं, माळा, नारळ आदी निर्माल्य वेगळे करून संकलित केले. तसेच नागरिकांना निर्माल्याचा पर्यावरणपूरक उपयोग व प्रदूषण टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. संकलित निर्माल्याचा उपयोग सेंद्रिय खत व इतर पर्यावरणपूरक प्रक्रियेसाठी केला जाणार आहे. 


कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एस.एन. सपली, सीईओ डॉ.  आर.एस. जहागीरदार तसेच विभाग प्रमुख  डॉ. विकास यादव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय राहिला.
नगर परिषद व ग्रीन क्लबने या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पर्यावरण जनजागृतीसाठीच्या योगदानाचे विशेष अभिनंदन केले.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा